अबकी बार ८४ हजार पार! सेन्सेक्सने गाठला नवा विक्रम, गुंतवणूकदारांची चांदी

भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने - स्टँडर्ड अॅण्ड पूअर्सचा अंदाज

    20-Sep-2024
Total Views | 65

SENSEX
 
 
मुंबई (Share Market update today) : प्रमुख बँकांच्या शेअर्समध्ये तेजी आणि जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक बदल याचा एकत्रित परिणाम शुक्रवारी (दि. २० सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बेंचमार्क इक्विटी इंडेक्स, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-50 आठवड्याच्या अखेरीस एका टक्क्यांच्या उसळीसह ऐतिहासिक पल्ला गाठण्यात यशस्वी ठरले. सेन्सेक्स पहिल्यांदाच ८४ हजार अंकांचा पल्ला गाठला. निफ्टीही जवळपास २५ हजार ८०० अंकांची उसळी घेत पूर्वीच्या विक्रमा जवळ पोहोचला. तर सेन्सेक्स १.६३ टक्क्यांनी उसळी घेत १३५९.५१ अंकांनी वधारला. या विक्रमी उसळीनंतर तो ८४ हजार ५४४.३१ इतक्या विक्रमी कामगीरीसह बंद झाला. तसेच निफ्टी १.४८ टक्क्यांनी वधारत ३७५.१५ अंकांनी उसळी घेत २५ हजार ७९०.९५ या नव्या विक्रमावर बंद झाला. निफ्टीत शुक्रवारी २५ हजार ४२६.६० आणि २५ हजार ८४९.२५ या दरम्यान व्यवहार झाले.
 
  
सेन्सेक्सचे उच्चांकी शेअर्स
 
सेंसेक्सच्या ३० शेअर्समधील २६ शेअर्स वधारत बंद झाले. यात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एल अँड टी भारती एयरटेल हे पहिल्या पाच शेअर्समध्ये होते. याशिवाय नेस्ले इंडिया, अदानी पोर्ट्स, एचयुएल, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, मारुति, पावर ग्रीड, कोटक बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, आयटीसी, एचसीएल टेक, रिलायन्स, सन फार्मा, इन्फोसिस, टाइटन, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, एक्सिस बँक आणि NTPC च्या शेअर्सनीही चांगली कामगिरी केली.
 
सेन्सेक्समध्ये निच्चांकी शेअर्स
 
दुसरीकडे शेयर बाजारात विक्रमी उच्चांकी पातळी गाठल्यानंतरही काही शेअर्समध्ये झपाट्याने विक्री पहायला मिळाली. यात एसबीआय, इंडसइंड बँक, टीसीएस आणि बजाज फायनान्सच्या समभागांमध्ये विक्री झाली.
 
जागतिक बाजारांमध्ये सुधारणा
 
अमेरिकी फेडद्वारे व्याजदरांमध्ये सुरू असलेली कपात पहाता बाजारांमध्ये शुक्रवारी तेजी पहायला मिळाली. निक्की १.६८ टक्क्यांनी वाढला. तर एएसएक्स हँग सेंगमध्येही वाढ पहायला मिळाली. अमेरिकन शेअर बाजारात S&P 500 गुरुवारी रेकॉर्ड स्तरावर पोहोचला. डॉव जोन्स इंडस्ट्रियल एवरेजनेही एक विशिष्ट टप्पा पार केला. १.२६ टक्क्यांच्या वृद्धीसह पहिल्यांदाच तो ४२ हजारांवर बंद झाला. नॅसडॅक आणि स्टँडर्ड आणि पूअर्समध्ये क्रमशः २.५१ टक्के आणि १.७० टक्के वृद्धी झाली.
 
 
 
जपान, चीन आणि इंग्लडमध्ये व्याजदर स्थिर
 
जापानची मध्यवर्ती बँक (BoJ) ने व्याजदर ०.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवले. ज्यात २००८ पासूनचा उच्चस्तर मानला जातो. अर्थव्यवस्था मध्यम गतीने सुधारत असल्याचे म्हटले आहे. तसेच चीननेही आपल्या प्रमुख व्याजदारांना कायम ठेवण्याचा निर्णय घेत लोन प्राईम रेड हा ३.३६ टक्क्यांवर ठेवला आहे. पाच वर्षांचा एलपीआर हा ३.८५ टक्के होता. बँक ऑफ इंग्लडने आपल्या व्याजदरांना पाच टक्के दर स्थिर ठेवला आहे.
 
भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने!
 
 
भारत हा २०३० ते ३१ पर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने पुढे जात आहे, असा अंदाज स्टँडर्ड अँण्ड पूअर्स या पतसंस्थेने व्यक्त केला आहे. सुरुवातीच्या आर्थिक वर्षांत ही अर्थव्यवस्था ६.७ टक्क्यांनी वृद्धीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८.२ टक्क्यांनी वृद्धीसह लॉजिस्टीक, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसह सार्वजनिक क्षेत्रावरील भार कमी करण्यासाठी सातत्याने धोरणात्मक सुधारणा गरजेच्या आहेत. भविष्यात मजबूत वृद्धीसह शेअर बाजारातील गतिशील प्रतिस्पधात्मक वातावरण कायम रहाण्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. भारतातील प्रमुख बाजारातील निर्देशांकांत सहभागी झाल्यानंतरही भारत सरकारच्या बाँण्डमध्ये विदेशी गुंतवणूकीतही वाढ झाली, हे भविष्यात वाढ होण्याची संभावना व्यक्त करण्यात आली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121