शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्सची १४३१ अंकांची उसळी घेत ८३ हजारांवर
12-Sep-2024
Total Views | 25
मुंबई : अमेरिकन बाजारातील वाढीनंतर आज भारतीय बाजारदेखील वधारलेला दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ पाहायला मिळत असून बीएसई निर्देशांक सेन्सेक्स १४३१ अंकांनी वधारला आहे. तर निफ्टी ४७० अंकांची वाढ होत २५,३८८ वर बंद झाला आहे.
दरम्यान, सेन्सेक्स १४३१.०७ अंकांनी (१.७७ टक्के) वाढून ८२,९६२.७१ वर व्यवहार करताना दिसला. त्याचवेळी, एनएसई निफ्टी ५० ४७०.४५ अंकांनी (१.८१ टक्के) टक्क्यांनी वाढून २५,३८८ वर पोहोचला आहे. भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सकारात्मक दिशेने सुरू होण्याची शक्यता असून प्रमुख निर्देशांक वॉल स्ट्रीटवरील उच्च कामगिरीवर वाढले आहेत.
आशियाई बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये निर्देशांकात मोठे वजन असलेल्या टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांच्या घसरणीमुळे सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर भारतीय शेअर बाजार बंद झाला. बीएसई सेन्सेक्स काल ३९८.१३ अंकांनी किंवा ०.४९ टक्क्यांनी घसरून ८१,५२३.१६ वर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसईचा निफ्टी-५०देखील १२२.६५ अंकांनी किंवा ०.४९ टक्क्यांनी घसरून २४,९१८.४५ अंकांवर बंद झाला.