मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक वाढ नोंदविली आहे. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ दिसून आली आहे. पहिल्या सत्राच्या सुरूवातीच्या व्यवहारात घसरण होऊन दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. मेटल, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग खरेदीचा परिणाम बाजार बंद होताना तेजीत झाला. परिणामी, आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने वाढ नोंदवली.
दरम्यान, बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ६९४.३९ अंकांच्या वाढीसह ७९,४७६,६३ स्थिरावला तर निफ्टी २१७.९५ अंकांनी वधारला असून २४,२१३.३० च्या पातळीवर बंद झाला. आज मार्केट सुरु होताना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी-५० ने कमकुवत सुरुवात केली. विशेष म्हणजे सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात जबरदस्त वाढ झाली. बँकिंग आणि मेटल कंपन्यांचे शेअर्स देखील तेजीत बंद झाले.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी गुंतवणूकदारांनी हेवीवेट फायनान्शिअल स्टॉक्स खरेदी केले आहेत. स्टॉक्सचे मूल्यांकन कमी असल्याने कारणाने शेअर बाजाराला आधार मिळाला. तर दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेवर नजर टाकल्यास आशियाई बाजारात टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग सकारात्मक राहिले तर युरोपीय बाजार तेजीत होते. परंतु, अमेरिकन शेअर बाजारात सोमवारी घसरण झाली.