आगामी काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचा बाजारात 'जिओ' धमाका!
05-Nov-2024
Total Views | 61
मुंबई : आगामी काळात रिलायन्स जिओचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा दूरसंचार व्यवसाय जिओ आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत असून १०० बिलियन डॉलर बाजार मूल्य असणार आहे. २०२५ मध्ये जिओचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९ मध्ये मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्स रिटेल पुढील पाच वर्षांत सूचीबध्द होतील.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज २०२५ पर्यंत त्यांच्या दूरसंचार व्यवसाय जिओचा आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जिओ आयपीओ मूल्य १०० बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, रिलायन्स रिटेलचा आयपीओ २०२५ नंतरच येण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या या निर्णयाशी संबंधित दोन सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, अंबानींनी केकेआर, जनरल अटलांटिक आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून डिजिटल, दूरसंचार आणि किरकोळ व्यवसायांमध्ये एकूण २५ अब्ज डॉलर उभे केले आहेत. यासह दोन्ही व्यवसायांचे मूल्य १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ आयपीओच्या माध्यमातून कंपनी ४७९ दशलक्ष सदस्यांकडून सक्षम व्यवसायासह भारतातील नंबर १ टेलिकॉम प्लेयर बनले आहे.