संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग किंमतीत मोठी वाढ
कोचीन शिपयार्ड, बीईएल, एचएएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वृध्दी
16-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या माध्यमातून देशांतर्गत संरक्षण उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. भारताने संरक्षणात मोठी गुंतवणूक केल्यामुळे संबंधित कंपन्यांच्या बाजार भांडवलात भरघोस वाढ झाली आहे. भारतीय शेअर बाजारात सूचीबध्द असलेल्या कोचीन शिपयार्ड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(बीईएल), हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेड(एचएएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड(बीडीएल), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई) इ. कंपन्यांच्या समभाग किंमती वाढल्या आहेत.
दरम्यान, मागील एक वर्षाच्या कालावधीत संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या समभागासह, बाजार भांडवलात मोठी उलाढाल दिसून आली आहे. तसेच, येत्या २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये प्रस्तावित तरतुदी लक्षात घेता देशांतर्गत गुंतवणूकदारांना संरक्षण क्षेत्रातून २०० टक्के परतावा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना मोठी संधी चालून आली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांत उपलब्ध व्यवसाय संधीतून पुरवठा-साखळीतील आवश्यक अंमलबजावणीस मदत होणार आहे.