येत्या आठवड्यात शेअर बाजारात या गोष्टी असतील महत्त्वाच्या; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
18-Aug-2024
Total Views |
मुंबई : येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना विविध कंपन्यांच्या आर्थिक निकालांचा विचार करावा लागणार आहे. तसेच, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या व्यावसायिक हालचाली व जागतिक कलानुसार या आठवड्यात शेअर बाजारातील चढ-उतार अंवलंबून असणार आहे. मागील आठवड्यात कंपन्यांचे आर्थिक निकाल आले आहेत, अशा परिस्थितीत या सर्वांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान, येत्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी)च्या बैठकीच्या तपशीलांवर गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतील. स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लि. ICICI बँकेचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले, कंपन्यांचे आर्थिक निकाल आले असल्याने या आठवड्यात समष्टी आर्थिक आघाडीवर गुंतवणूकदारांना संकेत मिळू शकतील अशी कोणतीही शक्यता नाही. तथापि, जागतिक स्तरावर आर्थिक डेटा महत्त्वपूर्ण असेल, असे ते म्हणाले.
तर दुसरीकडे, जपानमधील चलनवाढीचा डेटा आणि यूएस एफओएमसी बैठकीचा तपशील महत्त्वाचा आहे. ज्यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. याव्यतिरिक्त, जागतिक स्तरावर अनिश्चितता बाजारासाठी नकारात्मक ठरू शकते. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या भांडवलाचा ओघ आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांवरही व्यापारी लक्ष ठेवतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आठवड्यात जागतिक कल, एफआयआय या बाबींचा शेअर बाजारातील चढ-उतारात निर्णायक ठरतील.