चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
Read More
India's kick & Saudi Arabia support काश्मीरच्या पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. इस्लामी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली. हत्येपूर्वी त्यांनी आधी धर्म विचारला, तर अनेकांना कलमाही म्हणायला लावला. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी गटांशी जोडला जातो. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीसुद्धा एका मुलाखतीत कबूल केले की, पाकिस्तानने पाश्चात्य देश आणि अमेरिकेच्या इशार्यावर दहशतवाद पोसला आहे. अशा परिस्थितीत, भारत या मुद्द्यावर सर्वच व्यासपीठांवरून पाकिस्तानला कोंडीत पकडण्
Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही.
Green Riyadh Project जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी शहरी वनीकरण प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘ग्रीन रियाध प्रकल्प.’ दि. 19 मार्च 2019 रोजी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी रियाधच्या चार मेगा प्रोजेक्ट्सपैकी एकाचे अनावरण केले. या प्रकल्पासह रियाधला जगभरातील ‘टॉप 100’ राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात सध्या नवे वादळ उठले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सूचित केले की, “जर सौदी अरेबियामध्ये पुरेशी जमीन आहे, तर तिथे पॅलेस्टिनी राष्ट्र का स्थापित होऊ शकत नाही?” त्यांच्या या वक्तव्यानेच मुस्लीम देशांमध्ये खळबळ उडाली. सौदी अरेबियाने इस्रायलशी संबंध सुधारण्याची शक्यता फेटाळून लावत सांगितले की, जोपर्यंत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही, तोपर्यंत इस्रायलशी सौहार्दपूर्ण संबंध शक्य नाहीत. युएई आणि इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ‘ओआयसी’ यांनीही सौद
सौदीअरबमध्ये ( Saudi Arebia ) असलेल्या तेल संपत्तीमुळे, या देशाचे जागतिक राजकारणात महत्त्व आहे. मात्र, इंधन म्हणून तेल वापरण्याऐवजी, इतर पर्याय आता जगभरात शोधले जात आहेत. काही वर्षांनी तेल इंधनाला नवीन पर्यायही उपलब्ध होतील. तसेच कधी ना कधीतरी, सौदीचा तेलसाठाही संपेल. त्यामुळे सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी, तेलसाठ्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी आर्थिक संपन्नता साधण्याचे मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, मक्का-मदिनामध्ये सर्वधर्मीय विदेशी नागरिक गुंतवणूक करू शकतील. मात्र, गुंतवणूक
सौदी अरबमध्ये यावर्षी एकूण २१४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यात १०१ गुन्हेगार परदेशी होते. त्यात पाकिस्तान्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे जादूटोणा, करणी वगैरे केली, म्हणूनही काही लोकांना फाशी देण्यात आली. जादूटोणा केला म्हणून फाशी दिली हे आपल्या भारतीयांना न पटणारे! पण, २०२४ साली हे असे घडत आहे.
रियाध : सौदी अरेबियामध्ये ( Saudi Arebia ) यावर्षी १०० पेक्षा अधिक परदेशी लोकांना फाशी देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा आकडा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी एका येमेनी नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दक्षिण-पश्चिमी भागात नजरानमध्ये फाशी देण्यात आली. यानंतर, यावर्षी फाशीची शिक्षा सुनावलेल्या परदेशींची संख्या १०१ झाली आहे. सौदी अरेबियाने २०२२ आणि २०२३ मध्ये ३४ परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा सुन
आधुनिक सुविधांच्या मागणीला सामावून घेत संरचना, सार्वजनिक बांधकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करतील. युरोपमधील नूतनीकरण केलेल्या विमानतळांपासून ते आशियातील उच्चभ्रू अपार्टमेंट्सपर्यंत, अनेक प्रभावी प्रकल्प आज जगाचा नकाशा बदलत आहेत. सौदी अरेबियातील अशाच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
इस्लाम खतरे में हैं’, ’व्होट जिहाद’ असे शब्द देशात अनेक वेळा आपल्या कानावर येत असताना, जगात मात्र बदलाचे वारे वाहत आहेत. मध्य आशियातील मुस्लीमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानने त्यांच्या देशात असलेली हिजाबवरील सक्ती नुकतीच उठवली आहे. यासाठी ताजिकिस्तानच्या संसदेने रीतसर कायदा करून हिजाबबंदी जाहीर केली. ताजिकिस्तान हा मध्य आशियामधील तालिबानशासित अफगाणिस्तानच्या सीमेवरील देश. या देशाच्या चारही सीमा या जमिनीने वेढलेल्या. त्यापैकी दक्षिणेकडे अफगाणिस्तान, उत्तरेकडे किर्गिझस्तान, पूर्वेकडे चीन तर पश्चिमेकडे उझबेकिस्
हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच, सौदी अरेबियातील एका अधिकार्याने सांगितले की, “यावर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे, तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो,” असे अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले.
हज हा मुस्लिम धर्मीयांच्या पाच मोठ्या धार्मिक कार्यांपैकी एक आहे. आयुष्यात एकदा तरी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना दरम्यान धार्मिक तीर्थयात्रा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. मात्र यंदा सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्याच्या नादात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे २७०० हून अधिक लोकांची अवस्था गंभीर आहे.
बुधवारी अफगाणिस्तानच्या शाळांमध्ये पुन्हा घंटा वाजली. शाळेबाहेर तालिबानच्या नेत्यांना पांढरे झेंडे दाखवून, स्वागताचे दिखाऊ सोपस्कार वगैरेही पार पडले. पण, अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानमधील मुली आणि महिला या शिक्षणापासून वंचितच! तालिबानी राजवट लागू झाल्यापासून, मुलींच्या शैक्षणिक अधिकारांवर गदा आली. अटी-शर्तींसह फक्त प्राथमिक शिक्षणाचा अधिकार तेवढा नाममात्र उरला. माध्यमिक शिक्षणासाठी त्या आजही पात्र नाही. त्यामुळे एकीकडे मुस्लीम राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारा सौदी अरेबियासारखा देश महिलांबाबत सुधारणावादी धोरणे र
इस्लामिक राष्ट्र सौदी अरेबियाने रमजान महिन्यात मशिदींमध्ये इफ्तार आयोजित करण्यास बंदी घातली आहे. सौदी अरेबिया सरकारने म्हटले आहे की, कोणताही इमाम मशिदीच्या आत इफ्तारचे आयोजन करणार नाही. यासोबतच इफ्तारसाठी देणगी घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
२०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करणार्या मोदी सरकारने भारताचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा सातासमुद्रापार नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्यांचे महत्त्व जगाला समजावून सांगत, त्याची महतीही पटवून दिली. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे योग. नुकतेच सौदी अरेबियातील मक्का येथे दुसर्या ’सौदी ओपन योगासन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच मदिना शहराला भेट देत, इतिहास रचला. मदिना हे इस्लाममधील सर्वात पवित्र शहरांपैकी एक मानले जाते. सौदी अरेबियातील मदिना शहरात एखादे गैरमुस्लीम शिष्टमंडळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, हे शिष्टमंडळ भारताचे होते. स्मृती इराणी पारंपरिक पोषाखात अर्थात साडी नेसून याठिकाणी पोहोचल्या. त्यांनी कोणताही दिखावा वा तुष्टीकरण न करता, मदिना शहराचा दौरा केला. त्यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळात एक काश्मिरी हिंदू आयआरएस निरूपमा कोतरू यादेखील पारंपरिक प
अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला आहे. या ड्रोन हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. हे जहाज इस्रायलशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून ते सौदी अरेबियातून भारतातील मंगलोरसाठी निघाले होते. भारतीय किनार्यापासून 217 सागरी मैल अंतरावर झालेल्या या हल्ल्यानंतर लगेचच भारतीय नौदल सतर्क झाले आणि त्यांनी आपले लढाऊ नौदल जहाज घटनास्थळी पाठवले.
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील 108 मदरशांमध्ये विदेशी निधीचा पुरावा सापडला आहे. शिक्षणाच्या नावाखाली या मदरशांना आखाती देशांकडून सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे उघड झाले आहे. हा पैसा कुठे खर्च झाला याचा तपास उत्तर प्रदेश एसआयटी करत आहे. यूपी सरकारने मदरशांना दिल्या जाणाऱ्या निधीची चौकशी करण्यासाठी एडीजी मोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली. अहवालानुसार, एसआयटीच्या तपासात 108 मदरशांना परदेशी निधी दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. या मदरशांकडून त्यांच्या बँक
मागील पाच आर्थिक वर्षात भारताची निर्यात सातत्याने वाढत आहे. २०१९ ते २०२३ च्या दरम्यान, भारत एक प्रमुख निर्यात केंद्र म्हणून आपली जागा जागतिक बाजारपेठेत बनवत आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अहवालानुसार, भारताची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया, ब्राझील या देशांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे.
फिफा २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी यांसदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, २०३४ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मुदतीच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जागतिक बोली लावणार नाही याबाबत स्पष्टता दिल्यानंतर २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाकडे सोपविण्यात आले.
व्यापार सक्षमीकरणासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रियाध मध्ये वरिष्ठ नेते आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत. गोयल सौदी अरेबियातील रियाध येथे फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या (एफआयआय) सातव्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यापश्चात गाझा पट्टीतील निर्वासितांसाठी मुस्लीमबहुल इजिप्तने आपल्या सीमा सरसकट बंद केल्या. याचाच अर्थ ‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणार्या याच इस्लामी देशांना ‘ब्रदरहूड’चा, मुस्लीम उम्माचा फक्त नामधारी पुळका; मग निर्वासित मुस्लिमांचे, त्यांच्याच धर्मबांधवांचेच लोंढे यांना का नको, हाच खरा प्रश्न!
भारताला मध्य पूर्व तसेच युरोपशी जोडणार्या प्रस्तावित ‘आयएमईसी’ प्रकल्पात पश्चिमी किनारपट्टीवरील बंदरांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. म्हणूनच केंद्र सरकार या बंदरांच्या विकासासाठी विशेषत्वाने प्रयत्नशील दिसते. मालवाहतुकीला चालना देणारा हा प्रकल्प असल्याने, बंदरांची क्षमता वाढविण्यावर भर देणे हे क्रमप्राप्तच.
मक्का येथील पवित्र मशीद अल-हरम येथे आलेल्या श्रद्धाळूंच्या वस्तू चोरणे, खिसा कापणे, मौल्यवान वस्तू चोरणे अशा घटना घडत होत्या. सौदी अरेबियामध्ये चोरी करणे, हे हराम मानले जाते असे म्हणतात; तसेच भीक मागणेही हरामच. बरं मक्केच्या पवित्र मशिदीच्या इथे अल्लाला मानणारे आणि अस्मानी किताबानुसार जगणारे-मरणारे येणारच.
राजधानी दिल्ली येथे नुकतीच जी-20 परिषद पार पडली. त्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्दांवर चर्चा झाली.
राज्यातील बहुचर्चित असा 'बारसू तेलशुध्दीकरण प्रकल्प' लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात यासंदर्भात एकमत झाले आहे. यावेळी, एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीझ अल सौद यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही उपस्थित होत्या.
G 20 च्या पार्श्वभूमीवर भारत व सौदी अरेबियात डझनभर सामंजस्य करार ( Memorandum of Understanding) झाल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.आयटी, कृषी, माहिती तंत्रज्ञान, फार्मा, पेट्रोकेमिकल, मानवी संसाधन या प्रमुख क्षेत्रात ही बोलणी झाल्याचे दिसून आले.
एका करारानुसार, पाकिस्तानने म्यानमारला २०१९-२१ या काळात ‘जेजी-१७ थंडर मल्टी रोल फायटर जेट’ पुरवले होते. हे फायटर जेट विमान ‘पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स‘ आणि चीनच्या‘चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन’ या दोघांनी मिळून निर्माण होते. मागच्या काही दशकांचा मागोवा घेतला; तर जाणवते की, चीन जगभरातील अविकसित देशांमध्ये शस्त्रास्त्र आणि युद्धसामग्री निर्यात करतो.
दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स बैठकीत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रीसला पोहोचले आहेत. गेल्या ४० वर्षांत ग्रीसला पोहोचणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ मध्ये त्या ग्रीसला गेल्या होत्या. ग्रीसमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील छायाचित्रे शेअर केली आहेत.
हरियाणातील मेवात येथील ३१ जुलै २०२३ रोजी जलभिषेक यात्रेत सहभागी असलेल्या हिंदू भाविकांवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. संपूर्ण नियोजन करून हा हल्ला करण्यात आला. यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये पाठवण्यात आलेले ऑडिओ इंडिया टुडे ग्रुपच्या हाती लागले आहेत. त्या ऑडिओनुसार कट्टरपंथीनी विशिष्ट समुदायाला हिंदूंवर हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
माणसात शिकण्याची इच्छा असली की वयाचे बंधन आड येत नाही. तशाच काहीसा प्रकार सौदी अरेबियात घडलेला बघायला मिळाला. सौदी अरेबियातील नवादा अल काहतानी या ११० वर्षीय वयोवृध्द महिलेने चक्क शाळेत हजेरी लावली आहे. वयाची शंभरी ओलांडली असताना देखील शाळेत जाऊन शिकण्याची उमेद सर्वांनाच भंडावून सोडेल.
गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु असून यात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी होत आहे. या संघर्षावर भारत तोडगा काढेल असा विश्वास भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय सुऱक्षा सल्लागार अजित डोवल यांनी थेट अरबी नेत्यासमोरच मुस्लिमांच्या प्रश्नांवर होणाऱ्या आरोपांचे खंडन केले असून ते म्हणाले , भारतातील मुस्लिम हे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या वक्तव्यांचे खंडन अजित डोवल यांनी केले आहे. ते म्हणाले, भारतात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असून जगात देश दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. तर ३३ मुस्लिम देशांतील एकूण लोकस
भारत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सौदी अरेबियात बैठक झाली. मध्य पूर्वेतील देशांचा समावेश असणारी आणि भारत व अमेरिकेचा सक्रिय सहभाग असणारी ही संघटना पश्चिम आशियातील संघटना ‘क्वाड’प्रमाणे प्रभावी ठरू शकते. या बैठकीबाबत ‘व्हाईट हाऊस’ने सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन, सौदीचे पंतप्रधान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान, युएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन झायेद अल नाह्यान आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
आपले विस्तारवादाचे ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणार्या चीनने अन्य धर्मांवरही आक्रमणे करण्यास सुरुवात केली. चीन सध्या तेथील उघूर मुस्लिमांची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतो. यंदा अशीच एक १३व्या शतकातील मशीद चीनच्या निशाण्यावर आली. युनान प्रांतातील नागु शहरात असलेल्या या नाजियिंग मशिदीचे घुमट आणि मिनार पाडण्याचा चीनचा प्रयत्न असून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
अरब देशांचा लाडका मानला जाणारा देश सीरिया आता पुन्हा अरब लीगमध्ये सामील झाला आहे. २०११ साली लोकशाही समर्थकांवर दडपशाही केल्याने सीरियाला अरब लीगमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. परंतु, एक दशकानंतर सीरियाची पुन्हा घरवापसी झाली आहे. शुक्रवार, दि. १९ मे रोजी सौदी अरेबियात अरब लीगची ३२वी बैठक पार पडली. त्यात सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी बैठकीत सहभाग घेत पश्चिमी राष्ट्रांवर प्रहार केले. अरब जगतातील या बदलांचे भविष्यात मात्र, अनेक दूरगामी परिणाम होतील. मध्य पूर्वेतील राजकारण वेगाने बदलत असताना अरब ल
सौदी अरेबियामध्ये एक नुकताच नवीन नियम पारित झाला. त्यानुसार सौदीमध्ये कामगार व्हिसा मिळण्यासाठी वयाची अट निर्देशित करण्यात आली आहे. त्यानुसार घरेलु कामगार महिलांसाठी काही नियम केले आहेत. अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा महिलांना घरेलु कामगार म्हणून काम करण्यासाठी वयाची अट २४ वर्षे निश्चित केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. इमरान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडी करत आहेत. अशा परिस्थितीत इतर देशातून तेथे पोहोचलेले अधिकारी आणि खेळाडू आपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना योग्य सुरक्षा आणि भारतीय खेळाडूंना लवकर परतण्याची विनंती केली आहे. बीएफएएमई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या भारतीय ब्रिज संघाला भारतीय उच्चायुक्तालयाने लवकरात लवकर
अरब देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि भारत या चार देशांच्या नेतृत्वातून लवकरच रेल्वे नेटवर्कद्वारे आखाती देशांना जोडणारा नवा प्रकल्प जगासमोर येणार आहे. ’ब्लू डॉट नेटवर्क’ या नावाने ओळखल्या जाणार्या या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या रविवारी अमेरिका, सौदी अरेबिया आणि युएईच्या सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली. यावेळी आखाती देशांना अरब देशांशी
मुस्लीमबहुल येमेन देशांतर्गत संघर्षाने ग्रासलाय. येमेन सरकार व हुती विद्रोही गटातील संघर्षात अन्य देशही पडद्यामागून सूत्रे हलवित आहेत. विद्रोहींना इराणचे, तर येमेन सरकारला सौदीचे समर्थन आहे. सौदी समर्थित सरकार आणि हुती विद्रोहींचा येमेनच्या अनेक भागांवर कब्जा आहे. या रक्तरंजित संघर्षाला आठ वर्षं पूर्ण होत आली असून, आता येमेनमध्ये शांतता नांदण्याची चिन्हे दिसू लागली आहे. येमेनमधील दोन्ही गट शांतता प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहेत. अमेरिकेचे विशेष दूत टीम लिंडर किंग नुकतेच येमेन खाडीच्या दौर्यावर गेले. त्या
एरव्ही शेजारील राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरणारा आणि विस्तारवादासाठी वाटेल त्या थराला जाणारा चीन सध्या बदलतोय. होय, चीन बदलतोय. आपल्या सीमा वाढविण्यासाठी कुरापती करण्यात चीन उतावीळच असतो. परंतु, वादाचे कारण ठरणारा आणि वाद निर्माण करणारा चीन चक्क वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेऊ लागला आहे. विश्वास बसणार नाही. परंतु, मागील काही महिन्यांपासून घडणार्या घटना पाहता, चीन आता दोन राष्ट्रांतील वाद वाढविण्याऐवजी तो मिटविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
चहुबाजूने अस्वस्थ आणि अन्नान्नदशा असलेल्या पाकिस्तानात पीठासाठी सामान्यांचे गेल्या काही दिवसांत हकनाक बळी गेले. महागाईबरोबरच राजकीय अस्थैर्य, न्यायालयाशी सत्ताधार्यांचा उभा डाव आणि ‘आयएमएफ’च्या पॅकेजकडे पाकिस्तान आस लावून बसलाय. अशी ही पाकी आवामची तडफड या देशासाठी अखेरची फडफड ठरण्याचीच शक्यता आता अधिक!
गरीब राष्ट्रांना कर्जाच्या विळख्यात अडकवून महासत्तेची स्वप्न पाहणार्या चीनने आता युआन अस्त्राचा उपयोग सुरू केलेला दिसतो. रशियापाठोपाठ, सौदी अरेबिया, युएई, ब्राझील यांच्या सोबतच अनेक आफ्रिकी, आशियाई देशांबरोबर व्यापारात चिनी चलन ‘युआन’चा वापर सुरू केला आहे. अमेरिकी डॉलरला हद्दपार करू पाहणार्या या चीनच्या ‘युआन’ची म्हणूनच समीक्षा करणे महत्त्वाचे ठरावे.
एकमेकांचे कट्टर शत्रू इराण आणि सौदी अरेबियात काही दिवसांपासून मैत्रीचे वारे वाहू लागले. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरियातही मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक-योल जपान दौर्यावर गेले होते. मागील १२ वर्षांनंतर प्रथमच दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी जपानचा दौरा केला. एका जुन्या वादामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव होता, ज्याचे पडसाद टोकियो ऑलिम्पिकदरम्यान पाहायला मिळाले होते. जपान आणि दक्षिण कोरियातील ही मैत्री महत्त्वपूर्ण मानली जात असून अमेरिकेनेही त्याचे स्वा
अनेक देशांमधून मशिदींमधून बांग किंवा अझान देताना ध्वनिवर्धकांवरून अगदी सकाळपासून दिवसातून पाच वेळा बांग देण्याची प्रथा सुमारे 90 वर्षांपूर्वी प्रस्थापित झाली. 1930च्या दशकात ध्वनिवर्धक उपकरणाचा शोध लागल्यावर लगेच काही वर्षात ती सुरू होऊन जगात सर्वदूर पसरली. आज मशीद म्हटली की, मनोरा आणि त्यावर चारही बाजूंनी लावलेले ध्वनिवर्धक हे दृष्य ठरलेले आहे. ध्वनिवर्धक जेवढ्या चढ्या आवाजात लावता येतील तेवढ्या आवाजात लावले जातात. त्यामुळे आसपास राहणार्या नागरिकांना त्रास होतो. मुसलमानांचे श्रद्धास्थळ असलेल्या सौदी अरेबि
भारत-रशिया दरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत होत असून, रुपया-रुबल अशा स्थानिक चलनात होणार्या या व्यापाराचा थेट फटका अमेरिकी डॉलरला बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीत तब्बल ४० टक्के इतके कमी डॉलरचे व्यवहार नोंद झाले आहेत. त्याविषयी...
तुर्कस्तान म्हणजेच तुर्की (नवीन नाव तुर्कीये) या पश्चिम आशियातील अनाटोलियन द्वीपकल्पावर स्थित आंतरखंडीय देशात काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना नुकतीच घडली. तब्बल ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे संपूर्ण तुर्कस्तान हादरून गेला. यात तीन हजारांहून जास्त जणांचा मृत्यू झाला असून, हजारोंच्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. पण, दहशतवाद आणि दहशतवादाला समर्थन देणार्या पाकिस्तानशी घनिष्ठ संबंध असलेल्या तुर्कस्तानसोबत भारताचे काही तुरळक तणाव कायम असले, तरी ओढवलेल्या परिस्थितीमुळे या देश
सध्या भारताकडे असलेले ‘जी २०’ देशांचे अध्यक्षपद हे भारताच्या सक्षम परराष्ट्र नीतीचे द्योतकच म्हणावे लागेल. कारण, भारताने आपल्या सर्वसमावेशक विदेशनीतीतून स्वार्थी विचार न करता, सर्वार्थाने ‘वसुधैव कुटुम्बकम्’चे सूत्र प्रत्यक्ष कृतीत अवलंबले. त्यामुळे जागतिक क्षितिजावर नव्या भारताचा झालेला उदय हा मोदी सरकारच्या यशस्वी आणि दूरदृष्टीपूर्वक परराष्ट्र धोरणाचा विजयच. त्याचाच या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
कौशल्य विकास प्रशिक्षणाला सरकारने उद्योगाला जोडण्याची तयारी चालविली आहे. हे धोरण स्वागत करण्यासारखेच आहे. पण, त्याचा विचार अजूनही काही अंगांनी व्हावा, असे वाटते.