अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला, : भारतीय नौदल 'विक्रम'सह रवाना!

    23-Dec-2023
Total Views |
Drone strike hits Mangalore-bound merchant ship off Gujarat coast

नवी दिल्ली : अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला आहे. या ड्रोन हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. हे जहाज इस्रायलशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून ते सौदी अरेबियातून भारतातील मंगलोरसाठी निघाले होते. भारतीय किनार्‍यापासून 217 सागरी मैल अंतरावर झालेल्या या हल्ल्यानंतर लगेचच भारतीय नौदल सतर्क झाले आणि त्यांनी आपले लढाऊ नौदल जहाज घटनास्थळी पाठवले.

हे व्यापारी जहाज कच्च्या तेलाने भरलेले असून त्याच्या क्रूमध्ये २० भारतीयांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दि.२३ डिसेंबर रोजी ड्रोन हल्ल्यात भारताच्या किनार्‍यावरील एका व्यापारी जहाजाचे नुकसान झाले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे एएफपीने सागरी एजन्सीच्या हवाल्याने म्हटले आहे. या जहाजाचा इस्रायलशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे. भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळ अरबी समुद्रात मानवरहित ड्रोन क्रॅश झाल्यानंतर जहाजाला आग लागली.

पोरबंदर किनार्‍यापासून २१७ नॉटिकल मैल अंतरावर अरबी समुद्रात व्यापारी एमव्ही केम प्लुटोच्या दिशेने जाणार्‍या भारतीय तटरक्षक दलाचे फ्रिगेट ICGS विक्रम, ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली, असे भारतीय संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले. संरक्षण अधिकार्‍यांनी असेही सांगितले की हे जहाज कच्चे तेल घेऊन सौदी अरेबियातील बंदरातून मंगलोरच्या दिशेने जात होते.
 
भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की अरबी समुद्रातील एमव्ही केम प्लूटोच्या परिसरात भारतीय नौदलाच्या युद्धनौका बाह्य भारतीय ईईझेडमधील व्यापारी जहाजांकडेही जात आहेत. नौदलाने सांगितले की, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गस्त घालण्यासाठी तैनात असलेले ICGS विक्रम घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. केएम प्लुटो या व्यापारी जहाजाला लागलेली आग विझवण्यात आली असली तरी त्यात काही अडचणी येत आहेत. सध्या या व्यापारी जहाजातील सर्व लोक सुरक्षित आहेत.
 
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. येमेनच्या हुथी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे मानले जात आहे. इस्रायलशी संबंधित कोणत्याही जहाजाला लक्ष्य करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यांनी यापूर्वीही अनेक जहाजांवर हल्ले केले आहेत.