बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी... श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीची वाट कुणाला गवसू शकते, कोण या वाटेवर येऊ शकते, त्याचे रहस्यच श्री हरीपाठातील या अभंगांमध्ये सांगितले आहे. प्रत्येक जीवाचे सुकृत उदयाला आल्याखेरीज त्याची ओढ श्री पंढरीकडे होणे नाही. श्री पंढरीनाथ हा सर्व संतांचा ध्येय विषय आहे. हा ध्येय विषय कसा आणि काय, हे सर्वांनीच समजून, जाणून घ्यायला हवे.
Read More
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ११० वा वर्धापन दिन समारोह शनिवार, ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सकाळी ११.०० हा कार्यक्रम पार पडणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात आगमन करणार असून, २१ जून रोजी पुण्यात त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर २३ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत दोन्ही पालख्या ग्रामीण भागातील नियोजित मार्गांवर प्रस्थान करतील.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
कोकण मराठी साहित्य परिषदेची कळवा शाखा नुकतीच स्थापन झाली असून या शाखेचा पहिलाच जाहीर कार्यक्रम शुक्रवार दि. १३ जून रोजी आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार, साहित्यिक प्रा.अशोक बागवे यांच्या अभ्यासातून निर्माण झालेले संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाचे निरूपण हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी होणार.
पावसाळा सुरू झाला की आषाढी एकादशीचे वेध लागतात. पांडुरंगाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघतो. प्रत्येक हृदयाच्या गाभार्यातून ’पांडुरंग हरी, वासुदेव हरी’चा निनाद उठतो. पंढरीच्या वाटा जिवंत होतात, त्या वाटेवरून चालत असतात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम... त्यांच्या पाऊलखुणा म्हणजेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाची गाथा. संतांच्या या पालख्या म्हणजे चालती-फिरती भक्तीची विद्यापीठे, जिथे श्रद्धा हा श्वास आहे आणि समर्पण हा धर्म. या विशेष तीन भागांच्या सदरातून आपण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
(Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
Habap Nilesh Maharaj Jharegaonkar साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत पंथाची म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत खांद्यावर भगवी पताका घेऊन देहू, आळंदी, पंढरपूरकडे जाणारा वारकरी सर्वांनीच बघितला, पण हीच भगवी पताका घेऊन प्रासादिक कीर्तन सोहळ्यांसाठी तुरुंगाची वारी करणारे वारकरी म्हणजे हभप निलेश महाराज झरेगांवकर. वारकरी परिषदेचे मुख्य प्रवर्तक या जबाबदारीने समर्पित भावनेने ते कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची माहिती देणारा लेख...
संत नामदेव हे संत ज्ञानदेवांचे संतसांगाती होते. ज्ञानेश्वर समाधीस्थ झाल्यावर ५० वर्षे नामदेवांनी भक्ती संप्रदायाचे नेतृत्व केले व विठ्ठल भक्तीला पंजाबपर्यंत नेऊन राष्ट्रीय स्वरूप दिले. संत नामदेवांचे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत भक्तीकाव्य आहे. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांची पदे समाविष्ट आहेत. हिंदी भक्ती साहित्याचे व निर्गुण रामोपासनेचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचा कार्यगौरव कबीरांसह सकल संतांनी केलेला आहे. संत नामदेवांच्या मराठी अभंगगाथेत ‘रामकथा महात्म्य’ असे २७ अभंगांचे स्वतंत्र प
संत ज्ञानेश्वरांची अभंगगाथा नामभक्तीचा चैतन्यदीप आहे. या अभंग गाथेमध्ये सुमारे 992 अभंग आहेत. विविध विषयांवरील हे अभंग ज्ञानोत्तर भक्तीचे उत्कट दर्शन आहेत. त्यातील नामभक्तीपर अभंगामध्ये ‘राम आणि रामनाम महती’ या विषयावर अनेक अभंग आहेत. ‘मन हे राम जाहले, मी पण हरपले’ असे म्हणत, ज्ञानदेव रामनामाची फलश्रुती कथन करतात. पूर्वपुण्याई असेल, तरच रामराम जिव्हाग्री येते व रामनामाने भक्ताचा जन्म धन्य होतो. हरिपाठ व अभंगातून ज्ञानदेव निर्गुण परब्रह्म रामाची व रामनामाची महती सांगतात आणि, तोच विचार आपणास पुढील सकलसंतांच्य
संत शिरोमणी ज्ञानेश्वरांना वारकरी परंपरेतील सकल संतांनी गुरूस्थानी मानले आहे. त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘हरिपाठ’ आणि ‘अभंग गाथा’ या साहित्यामध्ये परब्रह्म रामाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन स्वरूपाचे दर्शन घडते. विठ्ठलाच्या एकविध भक्तीचा पुरस्कार करणार्या ज्ञानदेवांनी राम, कृष्ण, हरी, शिव या नामरुपामागील ईश्वर एकच आहे, या ‘अद्वैत’ तत्त्वाचा बोध केला आहे. त्यांच्या दृष्टीने विठ्ठलभक्ती आणि रामभक्ती एकच आहेत. राम तोच विठ्ठल आणि विठ्ठल तोच राम...असा त्यांचा अद्वैत उपदेश आहे.
अयोध्या, रामायण, रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबध कैक शतकांचा आहे. किमान १५०० वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे. मध्यंतरीच्या काळातील साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतानी अयोध्येचा महिमा वेळोवेळी वर्णन केला आहे. इ.स.च्या तेराव्या शतकाच्या अखेरीस तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ ते १२९६) व संत नामदेव (इ.स.१२७० ते १३५०) हे मराठीतले
नाशिक - पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर शिरल्याने अपघात होऊन पायी चालणाऱ्या ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करेल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या, त्यात संत मुक्ताई यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’॥ असे वर्णन केले आहे.
“आज शेतीपुढे विविध समस्या आहेत. या समस्यांतून बाहेर पडण्यासाठी आणि शाश्वत शेतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकर्यांनी कमीत कमी शेतजमिनीतून जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घ्यावे. त्यासाठी प्रत्येक शेतकर्याने एक तरी गाय पाळली पाहिजे. या माध्यमातून सेंद्रिय शेतीची कास धरावी,” असा मूलमंत्र पुणे येथील ‘अभिनव फार्मर क्लब’चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी दिला.
महाराष्ट्रात भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस हेच आहेत. याचा प्रत्यय ठाण्यातील भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात आला. भाजपच्या महाविजय-2024 मध्ये ठाणे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार दि. 17 रोजी गडकरी रंगायतनमध्ये भाजपच्या एक हजार ॠसुपर वॉरियर्सफबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती जागवली.
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत नाही. आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणास्थान होती. तिचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती. त्यानिमित्ताने मुक्ताबाईंनी निभावलेल्या माता, भगिनी, गुरू, मैत्रीण अशा विविध भूमिकांचे पदर उलगडणारा हा लेख...
चीनने भारताच्या ‘जी २०’ दस्तऐवजांवर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असा शब्दप्रयोग करण्यास नुकताच विरोध नोंदवल्याचे वृत्त झळकले. संस्कृत ही संयुक्त राष्ट्रात मान्यता प्राप्त भाषा नसल्याच्या कारणावरून चीनने हा शब्दप्रयोग उचित नसल्याचे म्हटले आहे. गोव्यात ‘जी २०’ ऊर्जा बदल मंत्रिमंडळाच्या बैठकीचे परिणाम दस्तऐवज आणि अध्यक्षांच्या सारांशमध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्दप्रयोग करण्यात आला होता, त्यावर चीनने आक्षेप घेतला. ‘जी २०’ दस्तऐवजामध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’चे ‘एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ असे इंग्रजी भाषांतर समाविष
तळमावले : आषाढी एकादशीचे औचित्य साधत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंग आणि त्याला साजेसे पोस्टर्स पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डॉ. संदीप डाकवे यांनी तयार केली होती. या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांनी आपला प्रदर्शन भरवण्याचा संकल्प पूर्ण केला. परिसरातील वारकरी यांनी या अभंग चित्र वारी उपक्रमाचे कौतुक केले. दररोज रेखाटलेले अभंग आणि त्या सर्व अभंगांचे आषाढी एकादशी दिवशी प्रदर्शन असा अनोखा योग डॉ.संदीप डाकवे यांनी साधला
स्वामींनी राम आणि विठ्ठल यांना कधीच वेगळे मानले नाही. स्वामींनी पंढरपूरला भेट दिली. तेव्हा, पांडुरंगाने दासांना रामरूपात दर्शन दिले होते. तो अद्वैत साक्षात्कार पाहून स्वामींच्या तोंडून उद्गार निघाले - ‘येथे का तू उभा श्रीरामा। मनमोहन मेघश्यामा।’
आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
आळंदी : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे संस्थेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान रविवारी दि. ११ जून रोजी पंढरपूर कडे प्रस्थान केले. सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मुख्य संकल्पनेतून डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, सुनिल वारे, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टी कडुन पालखी सोहळ्यात संविधान दिंडीच्या माध्यमातून वारकरी बांधवाना
रविवारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. परंतु, प्रस्थान सोहळ्याला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावर आता पोलिसांनी लाठीमार केल्याचे व्हिडिओ सगळीकडे पसरवले जात आहेत. परंतु, खरोखर लाठीमार झाला का की, वारीच्या माध्यमातून काही करामती लोकांनी आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
परंपरेप्रमाणे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. लाखो वारकरी मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यामध्ये सामील होत असतात. पारंपरिक भजन-कीर्तन आणि विठूनामाच्या जयघोषामध्ये हे वारकरी पंढरीच्या विठूरायाच्या ओढीने धावत असतात. धर्माला मरगळ आलेल्या काळात संतांनी वारीची परंपरा सुरू करीत धर्माची पताका तेजाळत ठेवली. आजची सामाजिक परिस्थिती पाहता, आता वारी हे जनजागृतीचे साधन व्हावे.
प्रल्हाद वामनराव पै यांना नुकताच महाराष्ट्र सरकारच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘जीवनविद्या मिशन’च्या कार्याचा गौरव करणारे एक प्रतीक आहे. यानिमित्ताने सद्गुरू वामनराव पै आणि ‘जीवनविद्या मिशन’च्या कार्याचा घेतलेला आढावा...
प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी तयार करण्यासाठी तो झटतोय. जाणून घेऊया तुषार ज्ञानेश्वर अष्टेकर या धर्मवेड्याविषयी...
प्राथमिक शाळांनी वीज देयक भरण्यासाठी पुरेश्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शाळांची वीज जोडणी तोडली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच या शाळांची वीज जोडणी तोडू नये, याबाबत वीज वितरण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा झाली असून त्यांच्यासोबत लवकरच बैठक देखील घेतली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याबद्दल महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महानुभाव पंथाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सातशेहुन अधिक वर्षापूर्वी रचली आहे त्यांनंतर जे पसायदान माउलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले ती प्रार्थना जेव्हा युनोच्या वार्षिक आमसभेत एकत्र म्हंटल्या जाईल तो मराठीचा सुवर्णदिन म्हणता येईल आणि तो दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा होईल. दरवर्षी आपण हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करतो. परंतु भाषेच्या सर्वांगीण विकासाबाबत आपण कायमच उदासीन राहतो. जनता जनार्दनच मराठी भाषेची उपेक्षा करत आहे असे वाटत असतांना आता सोशल मीडियाच्या जमान्यात चित्र सकारात्मकता दर्शविणारे
उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमात दिली .उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोह
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्यांचे दि. ८ फेब्रुवारी रोजी शपथविधी झाला.त्यावेळी सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची भेट घेतली. तेव्हा थोर स्वतंत्रसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी लिहिलेले 'अमृत मंथन' व 'अमृत गाथा' हे ग्रंथ सत्यजित तांबे यांना केसरकरांनी भेट म्हणून दिले.
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्यांचा दि. ८ फेब्रुवारी रोजी शपथविधी झाला. त्यावेळी सत्यजित तांबे शपथविधी घेण्यासाठी जात असताना तांबेच्या समर्थकांनी 'एकच वादा...सत्यजीत दादा' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही मग 'एकच वादा... अजित दादा' अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीने शपथविधी सोहळ्याचं स्थळ दुमदुमून गेलं. याबाबतचा व्हिडिओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"वारकरी संप्रदायाची परंपकर जोपासण्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सर्व मी करेन" अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले
उदासीनता हे सर्व आध्यात्मिक तत्त्वांचे सार आहे, असे स्वामी म्हणतात. आध्यात्मिक साधना करणार्याला उदासीनता नीट समजून घ्यावी लागते. त्यांचा अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, ती उदासीनता म्हणजे नैराश्य, उदासवाणेवाटणे नव्हे. उदासीनता याचा अर्थ विरक्ती म्हणजेच अनासक्ती, असा परमार्थमार्गात घ्यायचा असतो. अनेक भौतिक सुखसोयींच्या साधनांमुळे जगातील विविध गोष्टींची आसक्ती निर्माण होते. जीव त्यात गुंतून पडतो. ही बहिर्मुखता टाळून अभ्यासाने जीवाला अंतर्मुख विचारांकडे वळवले की, अनासक्तीचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे स्वार्
पंढरीची वारी आता केवळ ‘लोकल’ नसून ‘ग्लोबल’ झाली आहे.
विद्यार्थीदशेतच समाजभान जपत केवळ समस्या न मांडता त्यावर उपाययोजनेनुसार कार्य करणार्या ग्रीष्मा नागमोती हिच्या कार्याविषयी...
पुण्यातील वातावरणात आज निसर्गाच्या शीत लहरी, वारकऱ्यांचा भक्तिभाव आणि संस्था, संघटना आणि नागरिकांचा सेवाभाव अशा सकारात्मक कृतीने दिवसभर भारावून गेले.
वैदिक परंपरा आणि साधना
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करण्याबरोबरच मुक्या प्राण्यांना जीवन देणारे खाकीतील ‘जीवनदूत’ ज्ञानेश्वर एकनाथ शिरसाठ या पोलीस कर्मचार्याविषयी...
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊलींनी कुंडलिनी जागृतीनंतर येणार्या अतींद्रिय म्हणजेच पराशरीर (पॅरासायकॉलॉजी) अनुभवांचे जे सुंदर वर्णन केले आहे, त्याचा आशय योगमार्गात अग्रेसर असणार्यांना कळू शकेल, अन्यथा केवळ शब्दार्थाने त्याचे रहस्य कळणे असंभव आहे. त्यात वर्णन केलेल्या रहस्यमय अनुभवांचा अनुभूतिजन्य अनुभव आल्यावर जो एक आनंद प्राप्त होतो, त्याचे वर्णन करणे कठीण आहे.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचा विचार हाती घेऊन ज्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य केले, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या शब्दाशिवाय ज्यांची बोलण्यास सुरुवात होत नसे, तेच पूर्वाश्रमीचे डॉ. प्रा. राष्ट्रीय कीर्तनसम्राट श्रीकृष्ण वामनराव सिन्नरकर महाराज. ही सुरू झालेली जीवनयात्रा अलीकडे श्रीकृष्णानंद भारती स्वामी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. अशा व्यक्तिमत्त्वाचा ‘ज्ञानेश्वर माऊली’ ते ‘नमो नारायण’ हा प्रवास ३० ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री शांत झाला. महाराजांच्या जीवनविचारांचे स्मरण मांडण्याचा केलेला हा प्रयत्न ...
सर्वप्रथम कविता नुसतीच वाचायची नाही तर ती ‘भोगायची’ असते. त्यासाठी पूर्वग्रहांची सर्व वस्त्रं बाजूला सारून निर्वस्त्र होऊन तिला सामोरं जायला हवं. पूर्वग्रहदूषित असून चालणार नाही. नितळ मनानं कवितेच्या तळ्यात उतरलं तर सौंदर्याची कमळं हाती लागण्याचा संभव असतो; अन्यथा नाही.
कथा, कादंबरी, नाटक, कविता तसेच लोकवाड्.मयातील गवळणी, भारुडे, लावणी, पोवाडे अशा वाड्.मयीन कलाप्रकाराच्या विविध अंगांनी मराठी वाड्.मय समृद्ध होत गेले. या वाड्.मय प्रकारांनी सर्वसामान्य माणसांचे मनोरंजन केले. त्यातील रसास्वादाचा आनंद रसिक घेत असतात.
राज्यातील ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. ठाकरे सरकारची बदनामी केल्याचे कारण देत एका एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
‘बायोटेक्नोलॉजी’, हर्बल औषधांची निर्मिती, पीकसंरक्षण, सेंद्रिय व हर्बल उत्पादनाच्या क्षेत्रातील एक नामवंत जीवशास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
लेखक जनार्दन ओक यांनी कथा, नाटक आणि चित्रपट संवाद लेखन करून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविला, त्यांच्या लेखनप्रवासाविषयी जाणून घेऊया.
‘मॉर्निंग कन्सल्ट’ने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक पसंतीच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत. यानिमित्ताने मोदींच्या यशाचे रहस्य असलेल्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ नीतीचा परामर्ष...