अजितदादा विरुद्ध सत्यजित तांबे! शपथविधीवेळीही दिसला संघर्ष

    08-Feb-2023
Total Views | 98
Slogans at the swearing in of the newly elected members of the Legislative Council



मुंबई
:- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्यांचा दि. ८ फेब्रुवारी रोजी शपथविधी झाला. त्यावेळी सत्यजित तांबे शपथविधी घेण्यासाठी जात असताना तांबेच्या समर्थकांनी 'एकच वादा...सत्यजीत दादा' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही मग 'एकच वादा... अजित दादा' अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीने शपथविधी सोहळ्याचं स्थळ दुमदुमून गेलं. याबाबतचा व्हिडिओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दि.८ फेब्रुवारी रोजी सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची भेट घेतली. तेव्हा थोर स्वतंत्रसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी लिहिलेले 'अमृत मंथन' व 'अमृत गाथा' हे ग्रंथ सत्यजित तांबे यांना केसरकरांनी भेट म्हणून दिले.

अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121