ठाणे : महाराष्ट्रात भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस हेच आहेत. याचा प्रत्यय ठाण्यातील भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात आला. भाजपच्या महाविजय-2024 मध्ये ठाणे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार दि. 17 रोजी गडकरी रंगायतनमध्ये भाजपच्या एक हजार ॠसुपर वॉरियर्सफबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती जागवली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौर्यादरम्यान त्यांनी ठाणे शहरातील गडकरी रंगायतनमध्ये ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपने नियुक्त केलेल्या एक हजार सुपर वॉरियर्ससोबत हितगुज केले.
लोकसभा निवडणूक प्रमुख विनय सहस्रबुद्धे, आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार गीता जैन, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक संजय भेगडे, समन्वयक जयप्रकाश ठाकूर, भाजपच्या सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख सुभाष काळे, मनोहर डुंबरे, रवी व्यास, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, संदीप लेले, कृष्णा भुजबळ, दीपक जाधव आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी जनसंवाद यात्रेची रुपरेषा विषद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा देशाचे नेतृत्व करण्यासाठी ठाणे लोकसभेवर महायुतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. यावेळी भाजप पदाधिकार्यांशी मनमोकळेपणे संवाद साधताना कानउघाडणीही केली. 2024 मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवंय? असा प्रश्न बावनकुळे यांनी पदाधिकार्यांना विचारला. त्यावर ङ्गदेवेंद्र फडणवीसफ यांच्या नावाचा पुकारा सभागृहात झाला. यावर बावनकुळे यांनी ङ्ग मग लागा कामाला ङ्ग असा सूचक इशारा भाजप पदाधिकार्यांना दिला.
बाजारपेठ भाजपमय झाली...
बाजारात काही वनवासी महिला मी लाभार्थी, फलक झळकवत या जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्या होत्या. काही कार्यकर्त्यांनी तर चेहर्यावर बावनकुळे यांचा मुखवटा लावला होता. येथील दुकानामध्ये बावनकुळे थेट ङ्गमाईकफ घेऊन व्यापार्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये गेले. ङ्गपुढचा पंतप्रधान कोण असेल? पुन्हा मोदीच का हवेत? असे प्रश्न बावनकुळे हे व्यापारी आणि ग्राहकांना विचारत होते. एका व्यापार्याने पुढील 100 वर्षे आम्हाला मोदीच पंतप्रधान हवेत, असे सांगत ङ्गजय श्री राममची घोषणा दिल्याने अवघी बाजारपेठ भाजपमय झाली होती.