ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

    30-May-2025
Total Views | 19
 
unauthorized construction in Airoli
 
नवी मुंबई :  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फतआयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
 
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत विवेक कोटकर व ईतर, विनिता अपार्टमेंटच्या मागे, ऐरोली गाव, सेक्टर-20, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते.
 
सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम नमुंमपाच्या अंतर्गत अंशत: निष्कासित करण्यात आले आहे.
 
या धडक मोहिमेसाठी 3 ब्रेकर, 2 हॅमर, 1 गॅस कटर, 10 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला असून, मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अतिक्रमण विषयक अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई अंतर्गत सदर बांधकाम धारकाकडून रूपये 50,000/- प्रमाणे दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले आहे. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल;

दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल; 'महाराष्ट्र मेड लिकर' बाजारात आणणार

महाराष्ट्राच्या तिजोरीत थेट १४ हजार कोटी रुपयांची भर घालण्यासाठी महायुती सरकारने मद्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मंगळवार, दि. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क ३ पटीवरून ४.५ पट वाढवण्याचा, तर देशी मद्याचा दर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रुफ लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र मेड लिकर' या धान्याधारित मद्याच्या नव्या प्रकारालाही मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121