मुंबई : हिंदुंचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित उमराळे, करमाळे येथील उमादेवी मंदिर विश्वस्त व उमराळे करमाळे जेष्ठ नागरिक संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने काल ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी उमराळे येथील उमादेवी मंदिरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमादेवी मंदिर विश्वस्त अध्यक्ष अनंत दामोदर पाटील हे होते. तसेच उमराळे करमाळे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ वामन पाटील हे देखील उपस्थित होते. वक्ते म्हणून रा.स्व.संघाचे ठाणे विभाग कुटुंब प्रबोधन संयोजक नरेंद्र लक्ष्मण पितळे हे होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमादेवी साप्ताहिक मिलनाचे प्रमुख वसंत भास्कर पाटील ह्यांनी केले.सुत्रसंचालन करताना त्यांनी शिवराज्याभिषेकाबध्दल थोडक्यात माहिती दिली व मंचावरील सर्वांचे स्वागत केले . जेष्ठ नागरिक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय अण्णा नाईक ह्यांनी वक्त्यांचा विस्तृत परिचय करून दिला.अनिल नाईक ह्यांनी भारत छत्रपतींचा जयजयकार करा हे राज्याभिषेकावरील गीत सांगितले.वक्ते नरेंद्र पितळे ह्यांनी आपल्या बौद्धिककात शिवरायांची युद्धनीती,समरसता,परधर्मात गेलेल्यांची घरवापसी,स्वभाषा,स्वभुषा, स्वधर्म, स्वदेशी ह्यावर माहिती देऊन ते पुढे म्हणाले कुटुंब व्यवस्था टिकली तरच आपला समाज पर्यायी आपला देश टिकेल म्हणून माता जिजाऊंनी बालपणी शिवरायांना रामायण महाभारतातील देशभक्तीच्या गोष्टी सांगून संस्कार केले त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या मुलांबाळांनवर व नातवंडावर संस्कार करावे.
ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ठरलेल्या पंच परिवर्तन पाच मुध्यांपैकी पर्यावरणाचा विचार आमच्या उमादेवी मंदिर विश्वस्त व जेष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी करून उपस्थित सर्व शिवप्रेमी नागरिकांना भेट म्हणून कापडी पिशव्या देण्यात आल्या.शेवटी आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमादेवी विश्वस्त कार्यकर्ते आणि उमराळे करमाळे जेष्ठ नागरिक कार्यकारिणी सदस्य ह्या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली.