आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात व्यापक स्तरावर योग सत्रांचे आयोजन - मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

    20-Jun-2025   
Total Views | 7

कल्याण, जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आरोग्य विभागामार्फत ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि. २१ जून, २०२५ रोजी देशभरात साजरा होत असून, यानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी, कर्मचारीवर्गाने, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

योग दिनाचे प्रमुख वैशिष्ट्ये

१. २१ जून, २०२५ रोजी सकाळी ६:३० ते ७:४५ या वेळेत "योग संगम" या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

२. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

३. प्रत्येक सहभागी संस्थेने https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या पोर्टलवर नोंदणी करून सहभाग प्रमाणपत्र प्राप्त करावे.

४. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) – टप्पा २ अंतर्गत विविध स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरणीय उपक्रम योग दिनासोबत राबवले जाणार.

५. ‘एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे.

हरित उपक्रमांची जोड

योग सत्रांसोबतच प्रत्येक ठिकाणी "हरित योग" संकल्पनेतून वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, आरोग्य जनजागृती व शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समित्या, आयुष केंद्रे, शाळा व युवक मंडळे सहभागी होतील.

"योग ही जीवनशैली आहे. ती केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर मन, शरीर व समाज यांच्यातील समतोल साधणारी शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खाजगी दवाखाने येथे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121