गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना मिळणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे

    11-Jul-2025   
Total Views | 8

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मंडळातून दोन स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण मिळेल. यासाठी वॉर्ड कार्यालयांमार्फत मंडळांशी संपर्क साधला जाईल.

यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महानगरपालिका नियोजन करत आहे. लाखो भाविक आणि पर्यटक यासाठी येतात, त्यामुळे मंडप आणि परिसरात खूप गर्दी होते. या प्रशिक्षणात स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रण, दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी, प्रसाद वाटपाची काळजी आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन मिळेल. वॉर्ड कार्यालयांकडून मंडळांची यादी उप आयुक्त (परिमंडळ २) आणि गणेशोत्सव समन्वयक यांच्याकडे दिली आहे. प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार झाला असून, राजेंद्र लोखंडे आणि विकास कांबळे हे समन्वयक म्हणून काम पाहतील.

प्रशिक्षणात काय शिकवले जाईल?

- आपत्ती म्हणजे काय, धोके कसे ओळखावे
- जोखीम व्यवस्थापन आणि आपत्तीत काय करावे, काय टाळावे
- अग्निशमनाची प्रात्यक्षिके
- प्रथमोपचार
- गर्दी नियंत्रण

महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलिस, रुग्णालयातील डॉक्टर्स आणि विद्युत पुरवठा विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील. सर्व गणेशोत्सव मंडळांना या प्रशिक्षणात सहभागी होऊन, गणेशोत्सव सुरक्षित आणि पर्यावरणपूरक साजरा करण्यास मदत करावी.
- प्रशांत सपकाळे, उप आयुक्त

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121