मुंबई : यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक' २०२५ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पारितोषिक प्रदान करण्यात येते. पारितोषिकाचे स्वरूप रुपये २ लाख रोख रक्कम, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. या पारितोषिकासाठी पात्र उमेदवारांची नावे सुचवण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून, नाव नोंदविण्याची अंतिम तारीख शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ ही आहे. इच्छुकांनी यशवंतराव चव्हाण केंद्राशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज व माहिती प्राप्त करावी.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२८५९८ किंवा ई-मेल
[email protected] या माध्यमातून संपर्क साधावा.