आरोग्य विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचा दुसरा टप्पा दि. २८ जून पासून

    20-Jun-2025
Total Views | 6

semester examination of the University of Health Sciences will begin on June 28
 
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-२०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन दि. २८ जून ते २३ जुलै दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी, पदव्युत्तर, विद्यापीठ संचलित अभायसक्रमांच्या खालील परीक्षा संपन्न होणार आहे.
 
या पीक्षेत पदवी अभ्याक्रमाच्या (All Years- Repeater & Fresh Eligible students) BDS, BAMS (2010,2012,2017), BUMS(New, 2013, 2017), BHMS(Old, New, 2015), B.P.Th. (Revised, 2012), B.O.Th.(Revised), B.Sc. Nursing (All years), P.B.B.sc., First/Second/Third/Fourth/Fifth/Sixth Semester of Basic B.Sc. Nursing, All Semester of BASLP, B.P.O. (2017), (2nd Year- Repeater & Fresh Eligible students) BAMS/BUMS (2021), BHMS (CBDC-2022) तसेच पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या (All Years- Repeater & Fresh Eligible students) MDS, Diploma Dentistry, MD-MS Ayurveda & Unani (Other than 2024-Semester pattern), Diploma Ayurveda, MOTh, M.Sc - Nursing, MPTh, MPT, MASLP, M.Sc.(Audiology), M.Sc.(SLP), MPO (Repeater & Fresh Eligible students) MD/MS/DM, MCh/PG Diploma/M.Sc. Medical (Biochemistry & Microbiology) च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 
विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात MPH, MPH(N), MBA, M.Phil., B. Optometry, Dip. Optometry/Ophthalmic, Dip. Paramedical, CCMP. MMSPC, PG DMLT, BPMT, M.Sc. Pharmaceutical च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 
यामध्ये एकूण अंदाजे ८०,६५४ विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे. हिवाळी- २०२४ टप्पा-४ मधील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आलेल्या होत्या. तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे. उन्हाळी-२०२५ टप्पा-२ परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येतील असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
 
वरील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थींनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ०९.०० वाजता तसेच दुपारच्या सत्रासाठी दुपारी ०१.०० वाजता परीक्षाकेंद्रावर रिपोर्ट करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121