पालघर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थींचे आरोग्य तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार- जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
20-Jun-2025
Total Views | 6
खानिवडे : सर जे. जी. समूह रुग्णालय, व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत असलेले ग्रामिण आरोग्य प्रशिक्षण केंद्र व आरोग्य पथक पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील ३३आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार असून आरोग्य तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात पालघर पूर्वेतील नंडोरे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून करण्यात आली
सर जे. जी. समूह रुग्णालय, व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत असलेले ग्रामिण आरोग्य प्रशिक्षण केंद्र व आरोग्य पथक पालघर संस्था पालघर येथे सन १९५६ पासुन कार्यरत आहे. या केंद्रामार्फत प्राथमिक तथा द्वित्तीय श्रेणीतील आरोग्य सेवा दिल्या जातात.
आरोग्य शिबीरांद्वारे पालघर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थींची आरोग्य तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात यावे जेणेकरुन जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा स्तर वाढविला जाईल तसेच ही आरोग्य तपासणी व उपचार एकदा नसुन या केंद्रामार्फत वारंवार केली जाणार आहे . त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ३३ आश्रमशाळांमधील विद्यार्थींचे आरोग्य तपासणी व उपचार करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून. दिनांक २०/०६/२०२५ रोजी आश्रमशाळा नंडोरे, पालघर येथुन आरोग्य शिबीरे सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थींचे आरोग्य तपासणी व उपचार एक विशिष्ट उद्दिष्ठ घेऊन सुरु करण्यात आले असुन त्यामध्ये आरोग्य पथक पालघर केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट तसेच ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थी डॉक्टर्स उपस्थित राहुन त्यांच्याद्वारे शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीरांकरीता जिल्हा प्रशासना मार्फत पूर्ण सहकार्य करण्यात येत असून टि.ए.सी.आर (एन.जी.ओ) देखील या शिबीरांमध्ये सहकार्य करीत आहे. दिनांक २० जून रोजी आश्रमशाळा नंडोरे, पालघर येथे एकुण 500 विद्यार्थींचे आरोग्य चाचणी करण्यात आली तसेच आरोग्य शिबीरासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी वृक्षारोपण करुन आरोग्य शिबीराबाबत विद्यार्थींना तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करून महत्व समजवून दिले. उपजिल्हाधिकारी महेश सागर, डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई, डॉ. गीता परदेशी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई, डॉ. राकेश वाघमारे, प्रमुख व सहयोगी प्राध्यापक, आरोग्य पथक पालघर यांच्या मार्गदशनाखाली आरोग्य पथक पालघर केंद्रातील डॉ. सचिन नवले, वैद्यकीय अधिकारी, डॉ. बालाजी नलगोंडे, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अजित आर.. डॉ. एश्वर्या बी.. , भारती आंबेकर, सा.आ. परिचारीका, कृपा पटेल, सा.आ. परिचारीका, सुनंदा गावित, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सर्वेश लोहारकर औषध र्निमाता, परिचर्या, पदवीपूर्व विद्यार्थी डॉक्टर्स, रुग्णवाहीका चालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.