गौरी गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या

    20-Jun-2025
Total Views | 6

ठाणे - खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

गणेशोत्सव सुरु व्हायच्या तिन महिने आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेशभक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेशभक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत उभे राहून दमछाक होत होती. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनने ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करुन घेतली.

20 जून 2025 ते 5 जुलै 2025 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारती समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या (खिडकी क्रमांक 7 आणि 8) सुरु राहणार आहेत. आज 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या दोन खिडक्यांचे उद्घाटन केले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, सचिव बाळा गवस, रेल्वेचे अधिकारी रणजित झा, स्टेशन मास्तर केशव तावडे, प्रमिला देवगण, लकी कुमार, मिलिंद शिंदे, अनिल देवधर, दिनेश कुमार, संजीव कुलकर्णी, किरण नाक्ती, प्रकाश पायरे, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष बोडके, प्रितम रजपूत, निखिल बुजबुडे, अशोक कदम, विकास पाटील, मनोज गुप्ता, कुणाल पाटील, रुपेश पाटील, साहिल परब, मनिष साळवे, गणेश मुकादम, सचिन चांदुगडे, वसंत बोंडभर, बाळा केदार, प्रवासी संघटनेचे महेंद्र जाधव, सुरेश पालांडे, निलेश गवंडे, प्रदीप शितव, प्रदीप वारिसे, प्रविण बने, सुनिल बागुल, मिलिंद वायकर, शिवसैनिक आणि युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121