विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त व्यावसायिकांची बैठक
22-Jun-2025
Total Views | 10
मुंबई, सी पी टँक रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिर, माधवबाग हॉल येथे २१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दक्षिण मुंबई भाजपा अध्यक्षा शलाका साळवी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण मुंबई विभागातील डॉक्टर, वकील, व्यापारी ह्यांची बैठक पार पडली ह्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मंगलप्रभात लोढा, तसेच आमदार, नगरसेवक अतुल शाह होते तसेच ह्या कार्यक्रमाचे निवेदन महेंद्र जैन यांनी केले.
ह्या कार्यक्रमात मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीतील केलेल्या कार्याची प्रदर्शनी लावण्यात आली होती
या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित मुंबईतील अनेक प्रतिथयश डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटट, स्टील मार्केट, लादी बाजार असोसिएशनचे मोठे व्यापारी, राज के पुरोहित, निरंजन शेट्टी, कमलाकर दळवी, भाजपाचे ज्येष्ठ वकील कांतीभाई संगोई, माजी द.मुंबई अध्यक्ष शरद चिंतनकर , राजेश मिश्रा,सुशील राणे, सनी सानप, व सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.