नवी दिल्ली : संसदेच्या कामकाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. यावर्षी देशभरातून १७ खासदारांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे.
याशिवाय महाराष्ट्रातून खालील खासदारांना देखील संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे :
१ – स्मिता वाघ (भाजप)
२ – अरविंद सावंत (शिवसेना-ठाकरे गट)
३ – नरेश म्हस्के (शिवसेना)
४ - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)
५ – मेधा कुलकर्णी (भाजप)
६ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
७. सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
सदर पुरस्काराचे आयोजन संसद रत्न प्रतिष्ठान या संस्थेमार्फेत करण्यात आले होते. या निवड समितीचे अध्यक्ष निवड समितीचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांनी भूषवले. समितीने खासदारांच्या कामाचे मूल्यमापन केले आणि पुरस्कारर्थींचे नाव सुचवले. आसामचे भाजप खासदार दिलीप सैकिया सोनोवाल यांचाही पुरस्कारप्राप्त खासदारांमध्ये समावेश आहे. सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जुलै महिन्याखेरीज नवी दिल्ली येथे करण्यात येईल.