मी आयकर विभागाचा अधिकारी! १ कोटी द्या, अन्यथा...; छगन भुजबळ यांच्याकडे खंडणीची मागणी, काय घडलं?

    17-May-2025
Total Views | 33
 
Chhagan Bhujbal
 
मुंबई : आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी एका संशयिताला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. 
 
छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांना आरोपीने फोन करत आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाचा छापा पडणार असल्याचेही त्याने सांगितले. मी आयकर विभागाच्या पथकात असून तुम्हाला मदत हवी असल्यास १ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्या आरोपीने केली.
 
 
दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. राहुल भुसारे (वय २७) असे आरोपीचे नाव असून तो करंजाळी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीकडून ८५ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121