मुंबईतील पवई तलाव ओव्हर फ्लो!

    08-Jul-2024
Total Views |
Mumbai Powai Lake Overflow
 
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव दि. ८ जुलै रोजी पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी फक्च औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. पावसादरम्यान ओव्हर फ्लो होणारा हा मुंबईतील पहिला तलाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून तलावांच्या पाणी साठवण क्षमतेत घट झाली होती. पंरतु दि. ८ जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलावण ओसंडून वाहत आहे. तसेच पवई तलाव भरल्यामुळे लोकदेखील त्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी येताना दिसत आहेत. दरम्यान तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात निकाल लागणार असल्याचे बोलले जाते आहे.