मुंबई : राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन साहित्याच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील
अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष, महामंत्री, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सहकार्याध्यक्ष यांच्यासोबत संघटन मंत्री, समाज माध्यम प्रमुख आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत.
प्रदेश अध्यक्षपदी वाशीम येथील पद्मश्री नामदेव कांबळे तर महामंत्रीपदी नांदेड येथील प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर, उपाध्यक्षपदी प्रा.विसुभाऊ बापट (मुंबई), प्रा.डॉ. रविंद्र बेंबरे ( देगलुर) आणि अविनाश पाठक (नागपूर) अशा तीन नावांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांचे नाव जाहीर केले आहे. तर महाराष्ट्र प्रदेश सह कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ. बळीराम गायकवाड यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
संघटन मंत्री, सह संघटन मंत्री आणि समाज माध्यम प्रमुख म्हणून अनुक्रमे नितीन केळकर, शशीकांत घासकडवी आणि निकिता भागवत यांची नेमणूक झाली आहे. यावेळी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. प्रविण दवणे ( ठाणे ) आणि डॉ. अनुजा कुलकर्णी ( पुणे ) यांची नेमणूक झाली आहे.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य
विदर्भ प्रांत
लखनसिंग कटरे ( गोंदिया )
सचिन नारळे (नागपूर )
मोहिनी मोडक ( अकोला)
देवगिरी प्रांत
प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील ( जळगाव)
प्रा.डॉ. विजय लोहार. (जळगाव)
दत्ता जोशी (छत्रपती संभाजी नगर)
पश्चिम महाराष्ट्र
डॉ. उमा कुलकर्णी ( पुणे )
श्री. अहमद शेख ( पुणे )
प्रा.डॉ.अरुण ठोके ( नाशिक )
कोकण प्रांत
दुर्गेश सोनार ( कामोठे )
प्रविण देशमुख. ( कल्याण )
प्रा. डॉ. अरुंधती जोशी ( नवी मुंबई)