लेफ्टनंट जनरल राजीव घई भारतीय लष्कराचे रणनिती उपप्रमुख

    09-Jun-2025
Total Views |



नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी (रणनिती) नियुक्ती करण्यात आली आहे.


उपप्रमुख (रणनीती) हे पद भारतीय सैन्याच्या ऑपरेशन्स आणि इंटेलिजेंस डायरेक्टरेटसह इतर महत्त्वाच्या शाखांवर देखरेख करण्यासाठी तयार केलेले तुलनेने नवीन पद आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, भारतीय सैन्यातील ही सर्वात महत्वाची नियुक्ती मानली जाते.


लेफ्टनंट जनरल घई यांना ४ जून रोजी त्यांच्या विशिष्ट सेवेबद्दल संरक्षण प्रतिष्ठापन समारंभ २०२५ दरम्यान उत्तम युद्ध सेवा पदक (युवायएसएम) प्रदान करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल घई हे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डिजीएमओ) पदावरही कायम राहणार आहेत. विशेष म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारताने स्थगित करावे, ही विनंती पाकतर्फे करण्यात आली होती. त्यास डिजीएमओ म्हणून लेफ्टनंट जनरल घई यांनी प्रतिसाद दिला होता.