लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम

    09-Jun-2025
Total Views |
on the occasion of birthday Ramsheth Thakur made donations

पनवेल : गोरगरिबांचे कैवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि खारघरचा राजा मंडळाच्या वतीने खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून साहित्याचे वाटप केले आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच वयाची वर्षे पूर्ण केली असून, त्यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने खारघर शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले, तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, खारघरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, वनिता पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.