अलेक्झांडर पोपट अवैध विक्री करणाऱ्या तिघांना अटक

    31-Mar-2024
Total Views |


parrakit

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पुण्यातील औंध येथे असलेल्या लोहिया आय.टी. पार्क जवळ रविवार दि. ३१ मार्च रोजी तीन आरोपींना वनविभागाने बेड्या ठोकल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत वनविभागाने या तस्करांना अटक केली.

औंध येथे तीन जण अलेक्झांडर प्रजातीच्या पोपटांची तस्करी करत त्याची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाने आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला. रविवार दि. ३१ मार्च रोजी बनावट गिऱ्हाईक बनून पोपटांची अवैध विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात वनविभागाला यश मिळाले.

पियूष पासलकर, यश कानगुडे, सौरव झोरे अशी या तीन आरोपींची नावे असून उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये भांबुर्डा वनक्षेत्रपाल सपकाळ, वनरक्षक हाके आणि इतर वनकर्मचारी उपस्थीत होते. मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे यांनीही या कार्यवाहीत सहकार्य केले.

अलेक्झांडर पोपट वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्याच्या (१९७२) दुसऱ्या प्रवर्गात येणारी प्रजात असून यामध्ये कायद्यानुसार सात वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे.