ईशान्य भारतातुन नव्या वनस्पती प्रजातीचा शोध

पुर्व हिमालयाच्या भागातुन नोंद; पण माहितीचा अभाव

    29-Mar-2024   
Total Views |

Cyrtandromoea sudhansui


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
भारताच्या पुर्व हिमालयाच्या भागामधून सायरटँड्रोमोइया सुधान्सुई (Cyrtandromoea sudhansui) या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये २०२३ मध्ये झालेल्या वनसप्ती सर्वेक्षणादरम्यान पुर्व हिमालयामध्ये या नवीन वनस्पती प्रजातीचा (Cyrtandromoea sudhansui) शोध लागला.


का ठेवले सायरटँड्रोमोइया सुधान्सुई Cyrtandromoea sudhansui असे नाव?

पूर्व हिमालयातील पुष्प वनस्पतींच्या विविध प्रजातींवर तसेच पर्यावरणावर काम करणारे बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. सुधांशू शेखर डॅश यांच्या नावावरून सायरटँड्रोमोइया सुधान्सुई असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. 

सायरटँड्रोमोइया कुळ आणि फ्रायमाके या वर्गातील ही प्रजात असून तिचे वर्णन आणि चित्रण ही करण्यात आले आहे. सायरटँड्रोमोइयाच्या इतर प्रजातींपेक्षा ही प्रजात (Cyrtandromoea sudhansui) आकारमानाच्या वैशिष्ट्यांनुसार वेगळी असल्याचे संशोधक सांगतात. संशोधक डॉ. कृष्णा चावलू आणि त्यांच्या चमुने या प्रजातीचा (Cyrtandromoea sudhansui) शोध लावला असून फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.


हे वाचलंत का?: मुंबईतील चिऊताई पोहोचली कझाकिस्तानात!


IUCN रेड लिस्टच्या निकषांनुसार या नवीन प्रजातीचे माहितीची कमतरता (Data deficient) म्हणून मूल्यांकन केले गेले आहे. ही नवीन प्रजात भारतीय वनस्पतींमधील सायरटँड्रोमोइया या कुळातील दुसरीच प्रजात आहे.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.