आनंदाची बातमी - बेरोजगारी दरात लक्षणीय घट

पिरीओडिक लेबर फोर्स सर्व्ह डेटा सर्व्हेतील निष्कर्ष

    13-Feb-2024
Total Views | 53

unemployment  
 
 
आनंदाची बातमी - बेरोजगारी दरात लक्षणीय घट
 
 
पिरीओडिक लेबर फोर्स सर्व्ह डेटा सर्व्हेतील निष्कर्ष
 
 
मुंबई: इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार भारतातील बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाली आहे. त्रैमासिक पिरीओडिक लेबर फोर्स सर्व्ह डेटानुसार ऑक्टोबर - डिसेंबर २०२३ मध्ये हा दर ६.५ टक्केपर्यंत खाली आला आहे. महिला कामगार प्रतिनिधित्वात रेकोर्डब्रेक वाढ झाली असून महिलांच्या प्रतिनिधित्व संख्येत २५ टक्क्याने वाढ झाली आहे. शहरी बेरोजगारीत देखील घट झाली आहे. आर्थिक वर्ष ऑक्टोबर डिसेंबर २२ मधील बेरोजगारी दर ७.२ वरून मागील तिमाहीत ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
 
आर्थिक क्षेत्रातील घौडदौड, भारतातील वाढलेली गुंतवणूक, पोषक वातावरणामुळे उद्योग, स्टार्टअपमध्ये झालेली वाढ लक्षात घेता गतवर्षीच्या ७.२ टक्क्यांच्या तुलनेत पुढील वर्षी ७.३ टक्क्याने रोजगार वाढण्याची चिन्हे आहेत. महिला बेरोजगारी दरात कुठलाही बदल झाला नसला तरी पुरूष बेरोजगारी दरात मोठी घट झाली असल्याचे सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. १५ किंवा त्याहून अधिक वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारी दर आर्थिक वर्ष २४ मध्ये ८.६ टक्के राहिला आहे ‌. दुसरीकडे पुरूष बेरोजगारी दर घटून ५.२ टक्क्यांवर आला आहे. पूर्वीच्या बेरोजगारी आकड्यांवर आधारित कमी वेतन संधीत मोठी भर झाली आहे. सामाजिक संधीमुळे वाढलेल्या नोकरीच्या संधी वाढल्यामुळे हा रोजगार वाढला.
 
 
या अहवालासाठी ४४५४४ घरे, १६९२०९ व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली होती. एकूण या २२ राज्यातील सर्व्हेत, हिमाचल प्रदेशात सगळ्यात जास्त बेरोजगारी आढळली असून केरळ, जम्मू काश्मीर येथेही रोजगाराचे प्रमाण घटले आहे. स्त्री बेरोजगारी दरात देखील या राज्यात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121