जाहिरात क्षेत्रातील उलाढाल शिगेला ! डेनसू इंडियाचा अहवाल सादर

आर्थिक वर्ष २३ च्या ९३१६६ कोटी रुपयांचा तुलनेत २०२५ मध्ये ११२४५३ कोटी रुपयांची उलाढाल होईल

    12-Feb-2024
Total Views |

 Dentsu India  
 
 
 
जाहिरात क्षेत्रातील उलाढाल शिगेला ! डेनसू इंडियाचा अहवाल सादर
 

आर्थिक वर्ष २३ च्या ९३१६६ कोटी रुपयांचा तुलनेत २०२५ मध्ये ११२४५३ कोटी रुपयांची उलाढाल होईल
 

२०२५ पर्यंत जाहिरात क्षेत्र १.१२ लाख कोटींचा आकडा पार करणार
 

मुंबई: भारतीय जाहिरात क्षेत्रात सीएजीआर (कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट) हा ९.८६ टक्क्याने वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक वर्ष २३ च्या ९३१६६ कोटी रुपयांचा तुलनेत २०२५ मध्ये ११२४५३ कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज डेनसू इंडियाच्या नव्या अहवालात म्हटले आहे.
रिपोर्टनुसार डिजिटल मिडिया विभागात जाहिरातींवरील खर्च वाढण्याची ५५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून टिव्ही, प्रिंट मध्ये अनुक्रमे २५ टक्के व १६ टक्क्याने वाढणार आहे. डिजिटल मिडिया २०२३ मधील ४०६७५ कोटींवरून २०२५ मध्ये ६२०४५ कोटी रुपये होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
येणाऱ्या काळात या रिपोर्टप्रमाणे, टिव्ही, प्रिंट जाहिरातीत मोठी घट होऊन डिजिटल मिडिया जाहिरातीत मोठी वाढ होईल. सध्या डिजिटल मिडिया हे जाहिरात खर्चात सर्वांत मुख्य माध्यम असून त्यावर ४०६८५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यापाठोपाठ टेलिव्हिजन २९८३६ कोटी, प्रिंट माध्यमात १८६५२ कोटी खर्च केले गेले‌ .
प्रामुख्याने डिजिटल जाहिरात विश्वात, ऑनलाईन व्हिडिओ (११३६३ कोटी)सोशल मीडियाचा (११९६२ कोटी) सर्वाधिक सहभाग आहे. यातील मुख्य जाहिराती या एफएमसीजी (फास्ट मुव्हींग कनज्यूमर गुड्स) (३१४२८ कोटी) इतका असून त्याखालोखाल ई - कॉमर्स (१२८०३ कोटी), व कनज्यूमर ड्युरेबल्स (५५४० कोटी रुपये) इतका वाढला आहे .
अहवालावर भाष्य करताना, डेनसू दक्षिण आशियाचे सीईओ हर्षा रझदान म्हणाले, "भारताची डिजिटल क्रांती ही संख्यांच्या वाढीपेक्षा जास्त आहे; ही बदलाची लाट आपले जीवन, आपले उद्योग आणि आपल्या समाजात परिवर्तित होत असल्याचे स्पष्ट केले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.