सुरूवातीच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टी मध्ये थोडी घसरण

पीएसयु शेअरचा भावात घसरण व मामाअर्थचा नफा २६५ टक्क्याने वाढला.

    12-Feb-2024
Total Views | 28

stock market
 
सुरूवातीच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टी मध्ये थोडी घसरण
 

पीएसयु शेअरचा भावात घसरण व मामाअर्थचा नफा २६५ टक्क्याने वाढला.
 

मुंबई: आज सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजारात उतरती कळा पहायला मिळाली. पब्लिक सेक्टर युनिट, तेल कंपन्यांच्या भाग भांडवलात घट झालेली पहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झालेल्या पीएसयु शेअरचा विक्रीमुळे बाजार लाल सिग्नल दाखवत असल्याची एकंदर चर्चा चालू आहे. याशिवाय रिअल इस्टेट शेअर्स, मिडिया, धातू शेअर्स मध्येही घसरण पहायला मिळत आहे. सुरूवातीच्या सत्रात बेंचमार्क इंडेक्स कमी झाल्याने बीएससी १५० पूर्णांकांने कोसळून ७१४४२ वर व एनएससी निफ्टी ५३ पूर्णांकांने घसरून २१७२५ वर आले आहे.
 
बीएससी मिड कॅप व स्मॉल कॅप ०.२५ टक्क्याने वाढले आहे. विशेषतः मामा अर्थ कंपनीचा शेअर थेट ९ टक्क्याने वाढून तिमाहीत निव्वळ नफा २६५ टक्क्याने वाढत २६ करोड रूपये इतका झाला आहे. सेन्सेक्सवर विप्रो, एचसीएल, इन्फोसिस, टेक महिंद्राचे शेअर वधारले असून डॉ रेड्डीज, दिवीज लॅब सारखे शेअर मात्र घसरले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
 
९.५८ ला निफ्टी ०.२८ टक्क्याने घसरून २१७२२.४५ ला गेला व सेन्सेक्स ०.२१ टक्क्याने घसरून ७१४४५.०६ ला गेला होता.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121