मुंबई : रंगपीठ थिएटर-मुंबई आणि छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट-मुंबई या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कलावंत, कला प्रांतातले विद्यार्थी, धडपडणारे कलावंत, कला आभ्यासक, रसिक प्रेक्षकांसाठी ’मास्टर क्लासेस सिरीज ऑन अॅक्टिंग’ ( Acting Series ) आयोजित करण्यात आले आहेत. या नवीन उपक्रमाचा टप्पा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर आणि रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.
मास्टर क्लासेस सीरिजच्या या दुसर्या सत्रात शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध नाटक, चित्रपट दिग्दर्शक व निर्माते फिरोज अब्बास खान यांचा ’नाटक व चित्रपट अभिनय; एक जादूमय प्रवास’ या विषयावर तर, रविवारी सायंकाळी ७.३० वाजता दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचे ’व्यक्तिरेखा निर्मितीची प्रक्रिया आणि अभिनेता’ या विषयांवर मास्टर क्लास आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, हा उपक्रम निःशुल्क असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ७०३९४७५५३७/ ९८२०८६८६२८ या क्रमांकावर आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि रंगपीठ थिएटर मुंबईच्या अध्यक्षा गौरी केंद्रे यांनी केले आहे.