शाखा संगममधून समितीच्या सेविकांनी दर्शविले समन्वयाचे उदाहरण

    11-Nov-2024
Total Views | 35

Shakha Sangam Delhi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rashtra Sevika Samiti Shakha Sangam)
राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांच्या उपस्थितीत रविवारी दिल्ली प्रांतात शाखा संगम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पूर्ण गणवेशात एक हजारहून अधिक मुली, युवती, मध्यमवयीन महिला, वृद्ध महिलांनी आपला सहभाग दर्शवत समन्वयाचे उदाहरण सादर केले. दिल्ली प्रांतातील एकूण ३० शाखा यात सहभागी झाल्या होत्या.

हे वाचलंत का? : हिंदुत्वाच्या गाभ्यातच विश्व कल्याण समाविष्ट आहे : डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्र सेविका समिती आपल्या शाखेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. शाखा दररोज नवनवीन युवतींशी जोडत आहेत, त्यांच्या क्षमता वाढवत आहेत, त्यांना संघटित करत आहेत आणि देशभक्तीची भावना जागृत करत आहेत. एवरीवन नेचरली व्यवस्थापकीय संचालक रिवा सूद आणि शशी बुबना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रीवा सूद यांनी सेविकांच्या शिस्तीचे कौतुक केले व तन आणि मनाला धनाची साथ मिळाली तर स्त्री सशक्त राहते असे सांगितले.

राष्ट्र सेविका समितीला २०२६ मध्ये ९० वर्षे पूर्ण होणार आहेत. या प्रसंगी दिल्ली प्रांताने २०२६ मध्ये प्रांतात ९०० प्रशिक्षित सेविका आणि ९० घोष वादक सेविकांचे 'विराट पथसंचलन' कार्यक्रम आयोजित करतील असे लक्ष्य ठेवले आहे. प्रमुख संचालिका शांताक्का यांनी हे उद्दिष्ट राष्ट्र उभारणी आणि महिलांच्या उत्थानासाठी एक आवश्यक योजना असल्याचे वर्णन केले, जे येणाऱ्या तरुणी आणि मुलींना प्रेरणा देईल आणि सामाजिक दृष्टिकोनातून महिलांच्या भूमिकेसाठी त्यांच्या चेतना विकसित करेल. गीतेच्या १६ व्या अध्यायाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. जेणेकरून महिला सुशीला, सुधीरा आणि समेधेच्या दिशेने अग्रेसर होतील.

अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121