जबर मागणीमुळे मर्सिडीज बेंझची 'रेकोर्डब्रेक' विक्री.
हा ट्रेंड पुढील अर्ध्या वर्षात राहिल अशी अपेक्षा मर्सिडीज इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी वर्तवली
मुंबई: अनेकांसाठी स्वप्नपूर्ती असलेल्या लक्झरी कार मर्सिडीजची मुख्य कंपनी मर्सिडीज बेंझ यंदा व्यवसायातही टॉप गिअर वर पहायला मिळत आहे. कोविड काळानंतरही भारतात मर्सिडीजची अमाप मागणी असल्याने यंदाचे वर्ष कंपनीसाठी विक्रीच्या दृष्टीने सर्वात मोठे वर्षं असेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीने १५८२२ कारची विक्री केली आहे.आतापर्यंत लक्झरी कार सेंगमेट मध्ये हा नवा विक्रम मर्सिडीजने नोंदवला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मर्सिडीज बेंझ इंडियाचे संतोष अय्यर म्हणाले, 'कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या सहामाहीतच YoY बेसिसवर ८५२८ युनिट्स ची विक्री केली आहे. जी आता पर्यंतच्या अर्ध्या वर्षाच्या तुलनेत जास्त विक्री झाली आहे.' असे म्हणाले.
'आता आपण तिसऱ्या तिमाहीत प्रवेश केला असून आताही हा ट्रेंड चालू राहिल ही अपेक्षा आम्ही करतो. जेणेकरून पुन्हा एकदा अर्ध वर्ष ( सहामाहीत) चांगल्या विक्रीची नोंद देशात होऊ शकते.' असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले'.
कंपनीने नुकतेच इलेक्ट्रिक वाहनांच्या सेंगमेट यायचे घोषित केले होते. मार्केट मध्ये वेगवेगळ्या ब्रँडने इलेक्ट्रिक कारला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे.