भारताची आयात बरोबर निर्यात ७ टक्क्याने घटली
मुंबई:भारताची निर्यात ७ टक्यांने घसरून ३४ बिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे. आयातही ५.२३ टक्यांने घटून ५८.६४ बिलियन पर्यंत पोहोचली जी २०२२ मध्ये ६१.८८ बिलियन डॉलर इतकी नोंदवली गेली. या महिन्यात ट्रेड डेफीसीट २४.१६ बिलियन पर्यंत पोहोचली आहे. पाच महिन्यांत आयातही १२ टक्यांने घटल्याचे सरकारी आकड्यात दिसून आले.