सेबीने ७ जणांना एकूण ३५ लाखाचा गैरव्यवहार प्रकरणात दंड ठोठावला

लिक्वीड शेअर्स मध्ये घोटाळा

    13-Sep-2023
Total Views |
 
Sebi
 
 
सेबीने ७ जणांना एकूण ३५ लाखाचा गैरव्यवहार प्रकरणात दंड ठोठावला

 
लिक्वीड शेअर्स मध्ये घोटाळा
 
 
मुंबई:मार्केट रेग्युलेटर सेबीने ७ कंपन्यांवर ३५ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.लिक्वीड शेअर्स सेंगमेट मध्ये गैरव्यवहाराप्रकरणी सेबीने हा निर्णय घेतला आहे.वेगवेगळ्या ७ केसमध्ये प्रत्येकी ५ लाखांचा दंड सुभाष कुमार ( पोदार हाउसिंग फायनान्स HUF), मनोज कुमार गोयंका ( HUF),अयन अख्तर हुसेन,अंकित दिवानीया,राकेश गोलेचा,अंकुर तनेजा ( HUF),योगेश कुमार गुप्ता (HUF) यांना ठोठावण्यात आला आहे.
 
बीएसी मध्ये लिक्वीड स्टॉक ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये उलटसुलट व्यवहारांची नोंद सेबीने केली.एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१५ पर्यंत व्यवहारांची चौकशी सेबीने केली.अशा उलट व्यवहारांनी या एन्टिटीनै PFUTP ( Prohibition of Fradulent and Unfair Trade Pratices) norms चे उल्लंघन केले आहे.
 
सेबीने दुसऱ्या केसमध्ये नुकतेच Rudra Conventures चा परवाना रद्द केला आहे.अनाधिकृत कंत्राटी व्यवहाराप्रकरणी ही कारवाई सोमवारी करण्यात आली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.