आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ यांना अटक!

    14-Mar-2023
Total Views |
 
Sainath Durge
 
मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हीडिओ प्रकरणी दहिसर पोलिसांनी ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सोमवारी 13 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांना मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे हे युवासेनेचे नेते असून बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. ठाकरे गटाच्या ऑफिशिअल सोशल अकाउंटवरून व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यामध्ये साईनाथ दुर्गे यांचा सहभाग आहे असा पोलिसांना संशय आहे. साईनाथ दुर्गे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हीडिओ व्हायरल करण्यामध्ये साईनाथ दुर्गे यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.