मुंबईकरांसाठी गुन्हा दाखल, आजोबांना माझा अभिमान वाटेल: आदित्य ठाकरे

    18-Nov-2023
Total Views |
 
Aditya Thackeray
 
 
मुंबई : डिलाईल रोडच्या पुलाची दुसरी मार्गिका १० दिवसांपासून तयार असूनही सुरु करण्यात आलेली नव्हती. मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी असे गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्या आजोबांना अभिमान वाटेल. असं आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर डिलाईल रोडच्या पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणावर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे,
 
आदित्य ठाकरे म्हणाले, "काल रात्री की आज सकाळी माझ्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यांवर काही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे गुन्हे कशासाठी आहेत? तर मुंबईकरांसाठी लढण्यासाठी आहेत. मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आहेत? जो डिलाईल रोड ज्याची साधारणपणे शंभर ते एकशे वीस मीटरची एक लेन गेले दहा दिवस तयार असून का बंद ठेवली होती ? तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उदघाटन करायला वेळ नाही आहे."
 
"ती लेन बंद ठेवण्यात आल्यानंतर आपण पाहत असाल गेले अनेक वर्ष त्या डिलाईल रोडच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवाशांना आणि आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना रोज जे आमच्या वरळीत येऊन काम करत असतात. जे फ्लोटिंग पॉप्युलेशन त्यांना अनेक वर्ष हा त्रास होता. आम्ही जेव्हा पहिली लेन तयार झाली. तेव्हा हेच सांगितलं होतं जर त्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी उदघाटन केलं नाही तर आम्ही आम्ही गणपती बाप्पाची मिरवणूक नेऊन उद्घाटन करु. आणि त्यावेळी एक पालकमंत्री धावत पळत आले आणि काहीतरी नारळ फोडून गेले."
 
"आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत, आज सकाळी जी केस झालेली आहे. माझी याला एकच साधी सोपी प्रतिक्रिया आहे की, मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झाले आहेत." असं आदित्य ठाकरे म्हणाले.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.