महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर! उपमुख्यमंत्री शिंदेंची माजी नगरसेवकांसोबत बैठक संपन्न

    22-May-2025
Total Views | 16
 
Eknath Shinde
 
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
 
दरम्यान, आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे, सचिव संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गेल्या अडीच वर्षात केलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, एसटीपी उभारणीची कामे, सुशोभीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा वाढवण्याची कामे, कोस्टल रोड, मेट्रोची अशा अनेक लोकोपयोगी कामांची माहिती माजी नगरसेवकांना दिली. ही सर्व कामे त्यांना समजावून सांगत ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावी," असे आवाहन त्यांनी केले.
 
तसेच मुंबई शहर आमूलाग्र बदलत असून ते खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपाला येत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जाईल. तसेच रखडलेल्या इमारतींचा शासकीय यंत्रणांच्या भागीदारीतून पुनर्विकास करण्यात येईल. त्यामुळे मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येऊन राहू शकेल. या धोरणाची माहितीही यावेळी शिंदेंनी दिली. यासोबतच नगरसेवकांच्या विभागातील प्रश्न, त्यांच्या अडचणीदेखील जाणून घेत त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करणार :भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी दिली माहिती

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करणार :भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी दिली माहिती

स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख आ.प्रविण दरेकर यांनी दि.२९ जून रोजी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121