सहा वर्षांनंतरही 'हँकॉक पूल' रखडलेलाच !

प्रकल्प खर्च पाच पटीने वाढूनही पूल अपूर्णच

    05-Aug-2022
Total Views |

hanckok
 
मुंबई : मागील सहा वर्षांपासून काम सुरु असणारा सध्याचा मुंबईतील पूल म्हणजे हँकॉक पूल. माझगाव आणि डोंगरी परिसराला जोडणारा हँकॉक पूल बांधून १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र सहा वर्षानंतर हा पूल अद्याप पूर्ण झालेला नाही. या चार पदरी असणाऱ्या हँकॉक पुलाच्या दोन मार्गिका न्यायालयाच्या आदेशामुळे १ ऑगस्ट रोजी खुली करण्यात आली आहे. मात्र या पुलाचे आतापर्यंत झालेले काम हे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना सांगितले.
 
 
जानेवारी २०१६ मध्ये रेल्वेच्या तब्बल १८ तासांच्या मेगाब्लॉकच्या माध्यमातून हँकॉक पूल जमीनदोस्त करण्यात आला. परंतु १८ महिन्यात जो पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते तो पूल सहा वर्ष होऊनही अपूर्ण आहे. परंतु या सर्वात आमची समस्या मात्र कोण समजून घेईनासे झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर आता जरी पुलाच्या दोन मार्गिका खुल्या केल्या असल्या तरी या पुलावर अपघात होण्याची चिन्हे नक्कीच आहेत. पुलावरून वाहतूक करताना तुम्हाला जाणवेल कि रस्त्यावरील खाडी ही वर आल्यामुळे दुचाकी घसरण्याची शक्यता खूप जास्त असल्याचे देखील स्थानिकांनी स्पष्ट केले. तसेच संपूर्ण पुलाचे काम हे पूर्वीच्या पुलापेक्षा निकृष्ट दर्जाचे असल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे.
 
 
१४ कोटींमध्ये अपेक्षित असणारा खर्च मागील सहा वर्षात पाचपटीने वाढत ७५ ते ८० कोटींच्या घरात गेला आहे. परंतु असे असूनही अद्याप हा पूल पूर्ण झालेला नाही. या पुलासंबंधी अनेक डेडलाईन हुकल्या. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने १ ऑगस्टचा मुहूर्त साधत या पुलाच्या दोन मार्गिका जरी नागरिकांसाठी खुल्या केल्या असल्या तरी या मार्गिका अरुंद असल्याने अपघात होण्याचं दाट शक्यता असल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच ज्या भागात पुलाचे काम सुरु आहे तेथे अनेक गर्दुल्ले आणि दारुडे असल्याचेही स्थानिकांनी म्हटले आहे.
 
 
या परिसरात असलेल्या म्हाडाच्या इमारती, खासगी इमारती आणि गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पालिकेकडून अद्याप सोडविण्यात आला नसल्यामुले या पुलाचे काम सहा वर्षांनंतरही राखडलेलेचे आहे. या इमारतींमधील नागरिकांची जोवर पर्यायी व्यवस्था होत नाही टॉवर या पुलाचे काम पुढे सुरु होणे अशक्य आहे. दरम्यान या पुलाच्या शेजारील खासगी इमारत आणि गाळे मालकांशी पालिकेचा द्यात काही संपर्क झाला नसल्याचेही स्थानिकांनी स्पष्ट केले.
 
 
मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकानजीकचा ब्रिटिशकालीन हँकॉक पूल धोकादायक झाल्यामुळे २०१६ मध्ये तो पूल पाडण्यात आला. त्यानंतर २०१८ मध्ये नव्याने पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु कधी जलवाहिन्या, तर कधी नजीकच्या झोपड्यांमुळे पुलाच्या कामात अडचणी आल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात पुलाच्या कामास २०२१ मध्ये सुरुवात झाली.
 
 
चार मार्गिकांचा असणाऱ्या या पुलाच्या दोन मार्गिका पूर्ण झाल्या असून त्या सुरु देखील करण्यात आल्या आहेत. परंतु काही स्ट्रक्चर्स या पुलाच्या मध्ये येत असल्यामुळे हा पूल पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे त्या पुलाचे काम हे उत्तम झाले असून जर नागरिकांची काही तक्रार असेल तर त्यासंबंधी पाहणी करून पावलं उचलण्यात येतील.
- सतीश ठोसर, प्रमुख अभियंता, पूल विभाग, पालिका
 
पुलासंबंधी अन्य अपुरी कामे
- ठिकठिकाणी रंगरंगोटीची कामे
- रिसर्फेसिंग
- दिशादर्शक चिन्हे लावणे अपेक्षित
- पुलाच्या सुरवातीला वळणावर करण्यात आलेल्या तात्पुरत्या फेन्सिंगमुळे अपघात होण्याची शक्यता
 
पूल दुरुस्तीचा घटनाक्रम
- जानेवारी २०१६ - रेल्वेच्या तब्बल १८ तासांच्या मेगाब्लॉकच्या माध्यमातून हँकॉक पूल जमीनदोस्त
- फेब्रुवारी २०१८ - पुलाच्या अतिरिक्त खर्चासाठी पालिकेच्या स्थायी समितीकडून ५० कोटी रुपयांसाठी मंजुरी
- डिसेंबर २०२० - पुलाचा मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला
- १ ऑगस्ट २०२२ - न्यायालयाच्या आदेशान्वये तात्पुरत्या स्वरूपात पुलाच्या दोन मार्गिका वाहनांसाठी खुल्या
 
पुलासंबंधी...
- १८७९ मध्ये पुलाचे काम पूर्ण.
- १९२३ - मध्ये पुलाचे नव्याने काम करण्यात आले.
- पुलाची उंची - जुनी १६ फूट तर नवीन २१ फूट
- पुलाची रुंदी - जुनी ६० फूट तर नवीन ९० फूट
- शेफाली ढवण  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.