जिल्ह्यात घनकचरा प्रकल्प राबविणारी 'काल्हेर' पहिली ग्रामपंचायत

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

    07-May-2022
Total Views | 82
 
 
 
kalher
 
 
 
 
भिवंडी : शहरांपाठोपाठ गावांमध्येही कचऱ्याच्या विल्हेवाटीचे आव्हान निर्माण होत असतानाच, ठाणे जिल्ह्यात प्रथमच काल्हेर ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील ६० गावांमध्ये अशाच पद्धतीने घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या सुचना श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. 
 
 
 
 
ठाणे जिल्ह्यात वाढत्या शहरीकरणामुळे घनकचऱ्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषत: ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात भूखंड वा जागा नसल्यामुळे कचरा कोठे टाकावा, हा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये कपिल पाटील यांनी छोट्या जागेत कार्यरत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची माहिती घेतली होती. त्यानंतर काल्हेर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला. अन्, त्यानंतर आज हा प्रकल्प कार्यान्वित झाला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी केलेल्या भाषणात काल्हेर ग्रामपंचायतीचे कौतुक केले. या वेळी माजी आमदार योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, जयवंत पाटील, सरपंच भावना पाटील, उपसरपंच भरत पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील, छत्रपती पाटील आदींची उपस्थिती होती.
 
 
 
 
भिवंडी तालुक्यातील ६० गावांमध्ये कचऱ्याची समस्या आहे. या गावांमध्येही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवावा, अशी सुचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत काल्हेर गावाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्याअंतर्गत नव्या पाईपलाईन व घरोघरी नळाने पाणीपुरवठा होण्यासाठी सुमारे १० ते १२ कोटींची योजना मंजूर होऊ शकेल, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाने गावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ ध्येय निश्चित केले आहेत. त्यातील चार ते पाच ध्येय काल्हेर ग्रामपंचायतीने पूर्ण केली आहेत. या ग्रामपंचायतीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पही राबवावा. त्यातून परिपूर्ण गाव म्हणून काल्हेर उदयाला येईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी केले.
 
 
 
 
 
काल्हेर गावात दररोज २५ टन कचरा तयार होतो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पाच टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारला आहे. त्यातून दररोज दोन टन खत उपलब्ध होईल. खतविक्रीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मासिक ६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रोगराई कमी होईल. या प्रकल्पात किमान सहा ते आठ नागरिकांना नोकरी उपलब्ध होणार आहे. उर्वरित २० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढील टप्प्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121