सेक्टर २८ नेरूळ येथील अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई

    14-May-2025
Total Views | 6
 
unauthorized huts in Sector 28 Nerul
 
नवी मुंबई : ( unauthorized huts in Sector 28 Nerul ) नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागातील अनधिकृत झोपडयांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
 
बेलापुर विभागाअंतर्गत सेक्टर-२८, नेरुळ नवी मुंबई विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोरील सिडकोच्या भुखंडावरील अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. सदर झोपड्या स्वत:हून न हटविल्यामुळे विभाग कार्यालय बेलापूर या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली.
 
या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, कनिष्ठ अभियंत आत्माराम काळे, अे विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी/ कर्मचारी, जेसीबी-०१, मजूर-१५, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121