उल्हासनगर महापालिकेत मान्सूनपूर्व तयारीची नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक संपन्न
15-May-2025
Total Views |
उल्हासनगर: ( review meeting on pre-monsoon in Ulhasnagar Municipal Corporation ) उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समिती सभागृह येथे बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व तयारीची नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या आढावा बैठकीत जवळपास १२ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात २४ x ०७ आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे, पालिका क्षेत्र - नाले सफाईच्या कामाबाबतची प्रगती, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व सार्वजनिक स्वच्छता पूर नियोजनाच्या उपाययोजना, साथरोगांचे नियोजन ( प्रतिबंधत्मक औषधे / फवारणी), धोकादायक इमारती ( मोडकळीस आलेल्या स्थितीत) उपायोजना, रस्ते/ साकव दुरुस्ती, आपतग्रस्तांसाठी तात्पुरता निवाऱ्याची सोय, पूरसंबंधी प्रमाणिक कार्यपद्धती (SOP) तयार करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, शोध व बचाव करिता उपलब्ध (SOP) तयार करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, दरड कोसळणे / धोकादायक पूल / पूर जन्य ठिकाणाची पूर्व पाहणी व उपायोजना, अति धोकादायक झाडे, अशा १२ विषयांवर चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीत महापालिकेचे सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, सहाय्यक आयुक्त . मयुरी कदम, विशाल कदम, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, सलोनी निवकर, अलका पवार, अग्निशमन अधिकारी सुरेश बोबें, तसेच नायब तहसीलदार प्रशांत कुमावत व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.