भारताला अन्य देशांकडून ‘सेक्युलॅरिझम’ शिकण्याची गरज नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021
Total Views |

rss_1  H x W: 0


नवी दिल्ली : “सेक्युलॅरिझम’, लोकशाही आणि बहुलता हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. त्यामुळे भारतीयांना अन्य देशांकडून ही तत्त्वे आणि सर्वसमावेशकता शिकण्याची गरज नाही,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुवाहाटी येथे बुधवार, दि. २१ जुलै रोजी केले.
 
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते ‘सिटीझनशिप डिबेट ओव्हर एनआरसी अ‍ॅण्ड सीएए -आसाम अ‍ॅण्ड दि पॉलिटिक्स ऑफ हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमादेखीलउपस्थित होते. “भारतीय नागरिकांनी नेहमीच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वाचे पालन केले आहे. ‘सेक्युलॅरिझम’, लोकशाही आणि बहुलता ही भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे भारतीयांना जगातील अन्य देशांकडून सर्वसमावेशकता शिकण्याची गरज नाही. भारताने लोकशाही अलीकडील काळात स्वीकारली अथवा ‘सेक्युलॅरिझम’चा नंतर स्वीकार केला, असेही नाही. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करणारे आमचे महान नेते हे अतिशय उदारमततवादी होते. त्यामुळे भारतीय नागरिकांना या तत्त्वांविषयी नेहमीच सर्वोच्च आदर वाटतो,” असे डॉ. भागवत म्हणाले.


“मुस्लीम कुटुंबांचे भारतात नियोजनबद्धरितीने होणारे स्थलांतर आणि त्यांच्याकडून आसामी संस्कृतीवर होणारे अतिक्रमण हा चिंतेचा विषय आहे,” असे डॉ. भागवत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “एखाद्या विशिष्ट गटाला आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या जोरावर आपल्या धार्मिक, भाषिक आणि सामाजिक प्रथांची जबरदस्ती करतात, त्यावेळी अडचणी सुरू होतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ’एनआरसी’ आणि ‘सीएए’ हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे ‘सीएए’चा भारतीय मुस्लिमांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही,” असेही डॉ. भागवत यांनी नमूद केले.

 
‘कार्ल मार्क्सपेक्षाही लेफ्टिस्ट म्हणजे भारतीय डावे’

“देशातील वैचारिक विश्व अद्याप डावे आणि लिबरल्स यांनी व्यापलेले आहे. भारतातील डावे तर कार्ल मार्क्सपेक्षाही डावे आहेत. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’प्रकरणी या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर दिशाभूल केली आहे. आसाममध्ये या विषयांवरून त्यांनी भाषिक आणि जातीयतावादी प्रचार केला. तीच तत्त्वे नुकत्याच पार पडलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीतही सक्रिय झाली होती. मात्र, त्यांचा खरा खेळ लक्षात आल्यानेच ‘सीएए’ची खरी गरज अधोरेखित झाली आहे,” असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन



@@AUTHORINFO_V1@@