मुंबई : (Kangana Ranaut) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी - हिंदी भाषेवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर ५ जुलै मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरुन आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना कंगना यांनी यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रात भाषेवरुन लोकांमध्ये फूट पडायला नको. आपल्या देशातले लोक एकमेकांशी वेगवेगळ्या मार्गाने एकमेकांना जोडू पाहात आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर लोक एकोप्याने कसे राहणार? भाषेचा वाद निर्माण झाल्याने लोकांमध्ये अशा प्रकारे फूट पडत असेल तर कसं चालेल?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत चिंता व्यक्त केली.
यावेळी त्या म्हणाल्या, "अनेक लोक सहलीसाठी वेगवेगळ्या भागांमध्ये जात-येत असतात. अनेकांना वेगवेगळ्या भाषा येतात, अनेकांना येत नाही. म्हणून काय त्यांना मारहाण केली जाणार का? आपल्या देशाचा एकोपा कायम राहिला पाहिजे. भाषा असो किंवा कुठलीही गोष्ट जर देशाचं विभाजन करत असेल तर अशा गोष्टींपासून लांब ठेवले पाहिजेत. आपण परस्परांमध्ये एकोपा ठेवून आहोत, पण अशा प्रकारच्या घटना घडल्या की एकतेवरचा लोकांचा विश्वास उडू शकतो.", असे विधान त्यांनी केले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\