मुलुंडमधून स्पर्म व्हेलच्या उलटीची तस्करी उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2021   
Total Views |
whale _1  H x Wमुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुलुंडमध्ये व्हेल या सागरी सस्तन प्राण्याच्या उलटीची तस्करी (एम्बर्ग्रिस) उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
 
 
वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत व्हेल या सागरी सस्तन प्राण्याला संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे वा त्याच्या कोणत्याही शाररिक अवयवाची वा घटकाची तस्करी किंवा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. व्हेलमधील स्पर्म व्हेलच्या उलटीला एक मंद सुंगध असल्याने ते सुंगधी द्रव्य (परफ्यूम) तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे या पदार्थाला मोठी मागणी असल्याने त्याला चांगली किमंत मिळते. त्यामुळे मच्छीमार आणि व्यापारी या अवैध तस्करीच्या वतुर्ळात सक्रिय आहेत. अशाच २.७ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटची तस्करी मुलुंडमधून पकडण्यात आली आहे. अॅन्टॉप हिल गुन्हे शाखेच्या पथकाने कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.
 
 
 
 
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मुलुंडमध्ये व्हेलच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांनी संयुक्तपणे मंगळवारी सायंकाळी मुलुंडमध्ये छापा टाकला. येथील बोमाटे चाळ, सालपादेवी पाडाजवळील बाॅम्बे आॅक्सीजन कंपनीच्या मागे छापा टाकल्यावर त्याठिकाणी व्हेलच्या उलटीसह त्यांना तीन इसम आढळून आले. यावेळी त्या इसमांकडे २ लाख ७० हजार रुपयांची रक्कमही आढळून आली. पथकासोबत असलेल्या 'कांदळवन प्रतिष्ठान'च्या सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी या उलटीची तपासणी करुन त्याबद्दल खात्री केली. त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक आणि एन.जी.कोकरे यांनी केली.

 
 
 
उलटी म्हणजे काय ?
व्हेल हे माकुळ मासे खातात. या माशांची काटेरी दंत्तपट्टीकेमुळे शरीराअंतर्गत इजा होऊ नये म्हणून व्हेल आपल्या पित्ताशयामध्ये एक पदार्थ उत्सर्जित करतात. हा पदार्थ या दंत्तपट्टीकांना शरीराअंतर्गत इजा करु देत नाही. सरतेशेवटी हा पदार्थ उलटीवाटे किंवा विष्ठेच्याव्दारावाटे शरीराबाहेर फेकला जातो. त्याला 'एम्बर्ग्रिस' असे म्हणतात. हा पदार्थ बाहेरील वातावरणामध्ये आल्यानंतर कडक होतो. 

@@AUTHORINFO_V1@@