PUBG खेळताना हार्टअटॅक, १८ वर्षीय मुलाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2020
Total Views |

An 18-year-old boy died o

 



नांदेड : मोबाईलवर लोकप्रिय ठरणाऱ्या PUBG ऑनलाईन गेममुळे नांदेडच्या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. PUBG खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येऊन उपचारापूर्वीच त्याने जीव गमावला.


नांदेडच्या माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी गावात राजेश नंदू राठोड (18) हा तरुण राहत होता. लॉकडाऊन असल्याने घरी असल्याने मित्रांसोबत PUBG खेळायचा. राजेश मोबाईलवर मित्रांसह गेम खेळत होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. 



त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतू त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तीव्र झटक्याने त्याने आपला जीव गमावल्याची माहिती आहे. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माहूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे, तसेच अशा ऑनलाईन गेम्सवर सरकारने बंदी घालावी, अशी मागणीही केली जात आहे.


PUBG हा गेम खेळणाऱा प्रत्येक जण तिथल्या आभासी दुनियेत हरवून जातो. प्रतिस्पर्ध्यांना मारण्याच्या नादात अनेकदा समोरून हल्लेही होत असतात. गेमची रचना आणि ग्राफिक्स रोमांचकारी खराखुरा भासत असल्याने खेळणारा एका क्षणाला तणावातही येऊ शकतो. 


पब्जी खेळाच्या नादात मानसिक संतुलन हरवल्याच्या काही घटना यापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळाल्या आहेत. पब्जीच्या नादात अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आल्याने पालकवर्गाकडून या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.




@@AUTHORINFO_V1@@