धक्कादायक ! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या...

    दिनांक  29-Jul-2020 20:16:41
|

Ashutosh Bhakre_1 &n
 
नांदेड : मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने नांदेडच्या राहत्या घरी गळफास घेतला. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. या बातमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात येत आहे. आशुतोष भाकरे हादेखील अभिनेता असून त्याने 'भाकर' आणि 'इचार ठरला पक्का' या चित्रपटातून काम केले आहे.
 
 
आशुतोष भाकरे याने वयाच्या ३२व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस तो तणावातून जात होता. काही दिवासांपुर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये लोक आत्महत्या का करतात? हा आशय होता. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. ‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेने घराघरात पोहचली अभिनेत्री मयुरी देशमुखशी २१ जानेवारी २०१६ ला आशुतोष यांने लग्न केले होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.