बेल वाजवण्याच्या दोरीनेच केली एस. टी. कर्मचाऱ्याने आत्महत्या

    27-Feb-2021
Total Views | 159

ST letter_1  H
नांदेड : नांदेड येथे एका एस. टी. कर्मचाऱ्याने बेल वाजवण्याच्या दोरीनेच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली असून संजय जानकर (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पाणी नोट मागे सोडली आहे.
 
 
 
ST letter_1  H
 
 
 
संजय जानकर हे नांदेडमधील माहूर आगारात कार्यरत होते. त्यांच्याजवळील तिकीटामध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे कामावरुन आपल्याला काढले जाणार या भीतीने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. संजय जानकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये परिवहन मंडळाला जबाबदार धरले आहे. तिकीट काढण्याचे मशीन सतत बिघडते. त्यामुळे तिकीटांमध्ये तफावत आढळून आली आहे. काही चूक नसताना निलंबन होऊन समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे पत्रात म्हंटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121