आपत्कालीन हेल्पलाईन मोठ्या फलकांवर लावा - दिव्या ढोले यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन

Total Views | 78

मुंबई, पावसाळ्यात आपत्कालीन मदतीसाठी मनपाचे टोल फ्री क्रमांक मुंबईतील रस्ते व रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा-महाविद्यालय परिसर येथे मोठ्या फलकांवर प्रदर्शित करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्या दिव्या ढोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. दिव्या ढोले यांनी शुक्रवार, दि.१३ रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे महापालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

दिव्या ढोले यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मनपा प्रशासनाकडून घोषित करण्यात येणारे हे टोल फ्री क्रमांक हे मनपाच्या अधिकृत एक्स अकाऊंट, बेवसाईटवर प्रसिध्द करण्यात येतात. परंतू बऱ्याच सामान्य नागरिकांपर्यंत हे टोल फ्री क्रमांक वेळेत पोहचत नसल्याने या टोल फ्री क्रमांकाबाबत त्यांना कोणतीच माहिती नसल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने हे टोल फ्री क्रमांक हे मनपा प्रशासनाच्या हद्दीतील रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठया होर्डिंगवर/फलकावर तसेच बेस्टच्या बसेसवर प्रदर्शित केल्यास ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज व सुलभरित्या पोहचू शकतात व त्याचा नागरिकांना खऱ्या अर्थाने फायदा होवू शकेल. कारण मदतीचा एक फोन कॉल अनेकांचे प्राण वाचवू शकतो कारण प्रतिबंध हेच उपाययोजनेचे पहिले पाऊल आहे, अशी विनंती निवेदनाद्वारे दिव्या ढोले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर मंत्री श्री. लोढा यांनी पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121